कोरोना वेगाने पसरतोय; राज्यात नवीन कोविड प्रकरणांमध्ये 186% वाढ, 24 तासांत 4 मृत्यू
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका दिवसात जवळपास 186 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. (सातारा-2, पुणे-1, रत्नागिरी-1). तर काल एकूण 248 प्रकरणे नोंदवण्यात आली.
राज्यात गेल्या सात दिवसांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.82 टक्के आहे. राज्यात 3,792 सक्रिय प्रकरणे असून एका आठवड्यात 62 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
कोरोना रुग्णांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काल माहिती दिली की, कोविड सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य पुढील आठवड्यात मॉक ड्रिल आयोजित करेल. केंद्र सरकारने सुचविल्यानुसार, आम्ही 13-14 एप्रिल रोजी राज्यात आमच्या कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेणार आहोत.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी लोकांना घाबरून न जाता सतर्क राहून खबरदारी घेण्यास सांगितले. ते म्हणाले की, कोविडची संख्या वाढत आहे, पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण तो सौम्य प्रकार आहे. घाबरण्याची गरज नाही. पण आपण खबरादीर म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिज, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. ज्या भागात लोकसंख्येची घनता थोडी जास्त आहे तेथे संख्या वाढत आहे. पुणे, रायगड आणि ठाणे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या घनतेमुळे दररोज सकारात्मक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कॉमनवेल्थ चॅम्पियन्स वेटलिफ्टर संजीता चानूवर 4 वर्षांची बंदी
दरम्यान, महाराष्ट्रात एकही रुग्ण व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सपोर्टवर नाही, असेही मंत्र्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, मी दर 24 तासांनी याबाबत आढावा घेत असून आरोग्य विभागाला योग्य त्या सुचना देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोरोनाचे रुग्ण केवळ 48-72 तासांत कोविड रुग्ण बरे होत आहेत हे अतिशय समाधानकारक आहे. त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण प्रचलित XBB.1.16 डेल्टा व्हेरिएंट कोविडच्या दुसऱ्या लाटेत होता तितका प्राणघातक नसल्याचं त्यांनी सांगितलं.
देशभरात गेल्या आठवड्यात झालेल्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने COVID-19 साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. घाबरु नका, खबरदारी बाळगा, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पहाता मास्क वारा, असं यात सांगितलं आहे. शिवाय, श्वास घेण्यात अडचण आल्यास, उच्च दर्जाचा ताप/गंभीर खोकला, विशेषत: 5 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी, असं मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आलं.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात आज 3,038 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 21,179 झाली.