चाकणकर बाईचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात; ‘त्यांची’ टोळी महिलांचे शोषण करते; रुपाली ठोंबरेंचा सनसनाटी आरोप

Rupali Thombre Patil: अनेकांना सोशल टार्गेट करत आहे. या बाईला रुपाली चाकणकर हिनेच हे करण्यासाठी भाग पाडले आहे.

Rupali Thombare On Rupali Chakankar

Rupali Thombare On Rupali Chakankar

Rupali Thombre Patil on Rupali Chakankar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरविरुद्ध (Rupali Chakankar) आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केलाय. आपल्याच पक्षाचे नेत्या रुपाली चाकणकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चरित्र्यहनन बदनामी करत आहे, असा गंभीर आरोपही रुपाली ठोंबरेंनी केलाय.


महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या ‘MOA’ निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्‍या पॅनेलची घोषणा

रुपाली पाटील यांच्याविरोधात एका महिलेने एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यात रुपाली ठोंबरे यांनी मला मारहाण केल्याचा दावा महिलेने केला होता. नंतर हा व्हिडिओ त्या महिलेने डिलिट केला. त्यावरून लेट्सअपने रुपाली ठोंबरे पाटील यांच्या संवाद साधला. त्यावेळी ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्यावर मारहाणीचा आरोप करणारी महिला ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे. ती माझ्या कॉलेजमध्ये होती. तिला मी ओळकते. मी काल डॉ. संपदा मुंडे पीडितेच्या घरी होते. सकाळी चार वाजता मी बीडला गेले होतो. मग माझा आत्मा पुण्यात आला होता का ? असा सवाल ठोंबरे यांनी उपस्थित केलाय. (
Rupali Thombre Patil on Rupali Chakankar)

मोठी बातमी : ठाकरेंचा ढाण्यावाघ राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड; दोन महिने घेणार ‘राजकीय ब्रेक’


चाकणकर फेक अकाउंट तयार करून बदनामी करते-ठोंबरे

माधवी मंदार खंडाळकर ही महिला 2020 राष्ट्रवादीत होती. तेव्हा रुपाली चाकणकर ही शहराध्यक्ष होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ही महिला काम करत होती. त्यावेळी गौरी जाधव याही एकत्र काम करत होते. अचानक परवा माधवी खंडाळकर यांनी माझ्याविरुद्ध पोस्ट केली आणि डिलिट केली आहे. पोस्ट करण्यासाठी चाकणकर बाई फेक अकाउंट तयार करतात. अनेकांना सोशल टार्गेट करत आहे. या बाईला रुपाली चाकणकर हिनेच हे करण्यासाठी भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला. त्या महिलेने लगेच दुसरा व्हिडिओ जारी करून हे खोटं असल्याचे सांगितले. कुठेतरी सोशल मीडियाचा वापर करून बदनामी करणे आहे. राजकीय स्पर्धा असणाऱ्यांना नमोहरम करण्याची ही विकृत प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती केवळ पुरुषांमध्ये नाही, तर ही चाकणकरसारख्या बाईमध्ये आहे.

चाकणकरबाईचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात बावळटबाई
महिला आयोगाच्या अध्यक्षा, प्रदेशाध्यक्ष झाल्यात कामातून सिद्ध करा. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा तुम्ही पीडितावर आरोप करतात. पीडितेचे चरित्र्यहरण करत आहात. मी अजितदादांच्या पक्षात आहे म्हणून मी बोलले नाही आहे. रुपाली चाकणकरांवर गुन्हे दाखल केले पाहिजे.त्यांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला आहे. त्याचा विचार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करावा. मला बीडमध्ये विचारलंय, तुमचा पक्ष आमच्या मुलीची बदनामा करत आहे. तुम्हाला लाजा वाटत नाही, असे प्रश्न विचारत आहे. कोण उत्तर देणार, त्याचे उत्तर चाकणकर यांनी द्यावे. आयोगावर बसलाय, त्याचा भान नसेल, कर्तव्य नसेल. तर आम्ही शिव्या खायच्या आहेत. तेव्हा मी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस ते मत नाही. वरिष्ठस्तरावर निर्णय होईल, असे ठोंबरे म्हणाल्या.
चाकणकरबाईचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात आहे. बावळटबाई आहे. काही बोलते,

फेक अकाउंट काढून महिलांचे शोषण करते

महिलांना सक्षम, आत्मनिर्भर करायला हवे. तिथेही तिच्या सोबतच्या सोनाली गाडे, प्रज्ञा चव्हाण, पालवे, योसेफ, लतिफ पटेल हे फेक अकाउंट काढून महिलेचे शारीरिक व मानसिक शोषण करतात. मी नावासह आरोप करते. महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी हा कालचा प्रकार केला आहे. दुसरी महिला असती तर सुसाइट केली असती. रुपाली चाकणकर धमक्या देतात पद काढून देतात.

एका बाईला बोलवून एका आमदारविरोधात व्हिडिओ तयार केला

एका बाईला बोलवून एका आमदाराविरोधात व्हिडिओ तयार करायला लावला. त्यानंतर व्हिडिओ डिलिट केली आहे. ती महिला सुसाइड करायला निघाली होती. परंतु. माझ्याकडे तक्रार करायला आली. त्यानंतर व्हिडिओ डिलिट झाले, असा दावाही रुपाली ठोंबरे यांनी केलाय. तीने माझ्याविरुद्ध व्हिडिओ करायला लावला आहे. मी रुपाली चाकणकरविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. मी वकील उगीच नाही. चाकणकरला बुद्धी नाही. मी व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे. चाकणकरांनी हॅरॅश करायला चुकीची बाई निवडलीय, असे ठोंबरे यांनी म्हटलंय.

Exit mobile version