सुप्रिया सुळेंवर टीका; ठोंबरे पाटील आक्रमक, म्हणाल्या, ‘कुत्रंही..,’
महिलांबद्दल अशी विधाने केल्यास तुम्हाला कोणी कुत्रंही भीक घालणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील(Rupali Thombre Patil) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांवर(Gopichand Padalkar) निशाणा साधला. दरम्यान, राज्यात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीवर जात सडकून टीका केली. पडळकरांच्या याच टीकेवरुन रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला.
Maratha Reservation : सामाजिक आरक्षणांची मर्यादा वाढवा; काँग्रेसच्या हैद्राबाद बैठकीत ठराव
रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, राजकारणात महिलेचा सन्मान केला पाहिजे, स्पर्धा विचारांची आणि विकास कामांची करा, कुठल्याही महिलेविषयी बोलत असतील तर लोकं विचार करतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशांवर कारवाई करावी, जनता अशा लोकांना स्वीकारत नाहीत, आम्हीही महिला खपवून घेणार नाही जसाश तसं उत्तर देणार असल्याचा इशाराच ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.
Priya Bapat Birthday: रोमान्स अन् कॉमेडीचा तडका लावणारे मराठी ऑनस्क्रीन कपलबद्दल जाणून घ्या…
तसेच गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाच्या जीवावर आमदारकी मिळाली त्यांनी काम काय केलं? धनगरांच्या पदरात काय पाडलं? त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करु नये तुम्हाला कोणी कुत्रंही भीक घालणार नाही, या शब्दांत रुपाली ठोंबरे पाटील यांनी पडळकरांना सुनावलं आहे.
काय म्हणाले होते पडळकर?
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू असल्याचं विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.
काही लोकं जातीचं सोन करतात तर काही माती :
जातीचं सोनं करणारी काही लोकं असतात, तर काही लोकं माती करणारी लोकं असतात तसेच गोपीचंद पडळकर आहेत. पडळकर फक्त पवार कुटुंबार टीका करुन प्रसिद्धी मिळवताहेत, बारामतीतून अजितदादा दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक मताने निवडून आले बारामतीत धनगर समाज मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे कुत्रंही पडळकरांना भीक घालणार नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी पत्र लिहुनच करणार असून फडणवीस यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचंही ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.