Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी ( Loksabha Elections 2024 ) बारामती मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी घोषित केल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पक्षाने निवडणूक चिन्ह असलेलं बॅनर त्यांनी स्टेटस वर ठेवलं आहे. त्यामुळे बारामतीमध्ये सुळे आणि सुनेत्रा पवार ही लढत निश्चित झाल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
सस्पेन्स, थ्रिलर, अन् धमाका…; काजोल आणि क्रितीच्या ‘दो पत्ती’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मात्र आपण उमेदवारीची घोषणा केली नसून बारामती लोकसभा मतदारसंघाचे तिकीट आपल्याला दिले जावं अशी मागणी आपण पक्षाकडे केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिकीट मागितलं आहे.
Yash Raj Films : कलाकारांसाठी सुवर्ण संधी, यशराजने काढले स्वत:चे कास्टिंग अॅप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन चिन्ह मिळालेलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस असं हे चिन्ह आहे. त्याचं बॅनर बनवून मी माझ्या स्टेटसवर ठेवलं आहे. त्याद्वारे मी विनंती केली आहे की, मला तिकीट मिळावं. कारण माझं संसदीय कामकाज देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याकडून देखील गौरविण्यात आलं आहे.
PCMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
हे माझे भाग्य आहे. तसेच मला आत्तापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली. तसाच विश्वास त्यांनी पुन्हा एकदा या नवीन चिन्ह सोबत माझ्यावर टाकावा आणि मला संधी द्यावी अशी मी विनंती करते. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे आपण उमेदवारीची घोषणा केली नसून बारामती लोकसभा मतदारसंघाचे तिकीट आपल्याला दिले जावं अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे.
बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. आपल्या बहिणीचा पराभव करण्यासाठी अजित पवार देखील कामाला लागले आहेत. यासाठी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातून एकप्रकारे अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.