पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्यामुळं होणाऱ्या छळातून विवाहितेची आत्महत्या

पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्यामुळं होणाऱ्या छळातून विवाहितेची आत्महत्या

पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्यामुळं होणाऱ्या छळातून विवाहितेची आत्महत्या

Dowry victim in Pune : पुण्यात काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे हुंडाबळी म्हणून गाजत आहे. त्यावरून महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. (Pune) हे सगळ प्रकरण शांत होत की नाही तो पर्यंतच दुसरी घटना समोर आली आहे. पुण्यात एका २३ वर्षीय विविहित महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलंय. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती सुरज पाठक (२६) याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून नवविवाहितेने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली आहे. स्वाती सुरज पाठक (वय २३) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैष्णवी हगवणे, लाडक्या बहिणी;मनोज जरांगेंची तुफान बॅटिंग

महिलेचा पती सुरज पाठक (२६), सासू सुनिता पाठक ( ४५), दीर निरज पाठक (२३), मामा अरुण उपाध्याय (वय ४५) आणि मामा अरविंद उपाध्याय यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सूरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नात ५ लाख रुपये आणि सोन्याचे दागिन्याची मागणी करुन लग्नात १ लाख आणि ७ तोळे सोन्याचा हुंडा घेतला. लग्नानंतर मागणी प्रमाणे हुंडा दिला नसल्याने स्वातीला मारहाण करुन मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती.

तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासूने गहाण ठेवून पैसे घेतले होते. ते सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडे ३ ते ४ लाखा रुपयांची मागणी केली. तेव्हा स्वातीच्या वडिलांनी ३ लाख रुपये दिले. त्यानंतरही स्वाती यांना घरगुती कारणावरुन वादविाद करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून ७ जून रोजी स्वातीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

Exit mobile version