Download App

भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना ठरली

पुणे महानगरपालिकेने आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले

  • Written By: Last Updated:

 

Pune Municipal Corporation elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने Election Commission) दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचं जाहीर केलं. अशातच आता पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यात एकूण ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय राहणार आहेत. यातून एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत

Jabrat : मराठी रुपेरी पडद्यावर ‘जब्राट’ ; ‘या’ दिवशी होणार रिलीज 

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.22) प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभागांची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०११ च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.पुणे शहराची लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ३५९ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६ हजार,६३३ इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. या आधारावर ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. ही निवडणूक १६५ सदस्यांसाठी असेल. त्यासाठी ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ५ सदस्य असतील तर उर्वरित ४० प्रभागांमध्ये ४ सदस्य असतील.

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच घेतला गळफास, पोलिसांनी न्यायाधीशांनाच केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभे, नेमकं प्रकरण काय? 

आंबेगाव- कात्रज सर्वात मोठा प्रभाग
समोर आलेल्या माहितीनुसार, आंबेगाव-कात्रज हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा प्रभाग (१,१४,९७०) असेल आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान प्रभाग (७५,९४४) असेल. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार, कळस-धानोरी हा पहिल्या क्रमांकाचा प्रभार असणार आहे, तर महंमदवाडी -उंड्री हा शेवटचा प्रभाग म्हणजे, ४१ क्रमांकाचा प्रभार असणार आहे.

दरम्यान, नागरिकांना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जनतेला आवाहन केले आहे की, नागरिकांनी पुणे महानगरपालिका भवन स्वागत कक्ष, पुणे महानगरपालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वा. वि. दा. सावकरकर भवन येथे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात हरकतींचे अर्ज सादर करावेत.

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेसाठी नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ञ इत्यादींचा समावेश होता.

follow us