Nilesh Ghaywal : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढू लागली असून या गुन्हेगारी विश्वातील एक ‘बॉस’ या नावाने परिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) होय. नुकतेच धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कुस्ती स्पर्धेत कुख्यात गुंड निलेश घायवळ हा आला होता. मात्र या कुस्ती स्पर्धेदरम्यान एका पहिलवानाने घायवळच्या कानाखाली लगावली. व यानंतर पुन्हा एकदा घायवळ याचे नाव चर्चेत आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील निलेश घायवळ हा गुन्हेगारीमधील बादशाह बनलाय. मात्र कधीकाळी उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेलेला हा तरुण गुन्हेगारी विश्वाकडे का वळला ? या क्षेत्रामध्ये त्याचा गॉडफादर कोण आहे? त्याचा इतिहास काय आहे असे अनेक प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या.
शिक्षणासाठी पुण्यात आला अन् गुन्हेगारीकडे वळला
गुन्हेगारीत विश्वात वर्चस्व गाजवणारा कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी. उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंतच शिक्षणही त्याने पूर्ण केलं. त्यानंतर त्याची भेट गुंड गजानन मारणेसोबत झाली. सुरुवातीला त्याच्या टोळीत राहून गुन्हेगारीचे धडे घेतले. गजानन मारणेसोबत या त्याने एका गुन्हेगाराचा खून केला होता. पहिल्या खुनानंतर तो गुन्हेगारी विश्वाच्या प्रकाशझोतात आला. याप्रकरणात त्याने 7 वर्षांची शिक्षा भोगली.
मारणेसोबत फिस्कटलं अन् स्वतःची टोळी तयार केली
तुरुंगात जाऊन आल्यानंतर खंडणी, अपहरण, जमिनाचे व्यवहार, दलाली अशी कामे नीलेश मारणे गँगच्या साथीने करू लागला. परंतु जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला, त्याच संघर्षातून त्याने मारणे टोळीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. लवकरच घायवळ याने आपली टोळी उभी केली आणि कोथरूड, सुतारवाडीत स्वतःचा प्रभाव वाढवला व त्याने पुण्यात स्वतःची दहशत निर्माण केली. मात्र यामुळे मारणे व घायवळ टोळीमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली. घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला तर त्याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला. हळूहळू दोन्ही टोळीमध्ये संघर्ष विकोपाला जाऊ लागला.
विविध गंभीर गुन्हे दाखल…
शिक्षणाने मास्टर इन कॉमर्स असलेला निलेश घायवळ याने गुन्हेगारीत आपली पीएचडी पूर्ण केल्याचे त्याच्यावरील दाखल गुन्ह्यावरून समजते. याच्यावर हत्या, खंडणी, मोक्का, बेकायदा शस्त्र बाळगणं, टोळी युद्ध, अपहरण, दरोडा अशा गंभीर स्वरुपाचे 23 ते 24 गुन्हे पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. आजही “Boss” त्याच्या या नावाचा दबदबा पुणे शहरातल्या गल्लो गल्लीत आहे.
मारणे व घायवळ टोळीचा संघर्ष सुरूच
गेल्या काही वर्षात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात आहे. मारणे आणि घायवळ टोळीत अनेक सराईत गुन्हेगार काम करतात. दोन्ही टोळीमधील गुंड आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले आहे. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजक थराराचा पुण्याचा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र देशाला दिला, त्यांचे विचार जगभरात नेणार : अमित शाह
विशेष म्हणजे या गुंडाना राजकीय आश्रय मिळतो अशी चर्चा सोशल माध्यमांवर पाहायला मिळते, त्याला कारणही तसेच आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या वर्षी घायवळने भेट घेतल्यानंतर चर्चाना उधाण आलं होतं. तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही घायवळचे अनेक राजकारण्यांबरोबर संबंध आहेत.