Lok Sabha Election 2024 : लोकसभेबाबत अनेक वेगवेगळी भाकीत समोर येत आहेत. (Lok Sabha) नुकताच लेट्सअप मराठीने ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाष्य केलं आहे.(Lok Sabha Election ) शरद पवार बारामती राखण्यात यशस्वी होतील. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान होतील अशी सध्या स्थिती नाही असंही ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी हॅट्रीक करणार का? राहुल गांधींंना किती यश? ज्योतिषी मारटकर यांचं मोठ भाकीत
यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना या दोघांनाही फटका बसू शकतो असं भाकीत त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर, गेल्यावेळी जे खासदार निवडून आले होते ती संख्या गाठण फडणवीस यांना कठीण जाईल. तसंच, राज्यात त्यांच्या नेतृत्वावर शंका घेत त्यांना केंद्रातही बोलावलं जाऊ शकतो असं थेट भाकीत त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांची एखादीच जागा येऊ शकतो असंत ते म्हणाले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही मारटकर यांनी भाष्य केलं आहे. त्यामध्ये ठाकरे यांना मोठं यश मिळेल अस नसून मर्यादीतच यश ठाकरे यांना मिळेलं असं मारटकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना सध्या अडचणी दिसत आहेत त्यांमुळे जे मिळेल तेच ठाकरेंच मोठ यश असं म्हणाव लागेल. कारण नाशिक, शिर्डी, ठाणे अशा जागा ठाकरेंच्या येत नाहीत असंही ते म्हणाले आहेत.
लोकसभेचा ;लातूर पॅटर्न& देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची हवा?, भाजप हॅट्रीक मारणार का?
यावेळी मारटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना त्यांना मोठं यश मिळेल असं भाकीत केलं आहे. 13 पैकी तब्बल 10 जागा निडणून येऊ शकतात असं ठोस भाकीतच त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांपर्यंत त्यांच्या पदाला कसलाही धोका नसून लोकसभेला चांगल्या जागा आल्याने त्यांची विधानसभेला जास्त जागा मागण्याची ताकद वाढणार आहे असंही ते म्हणाले आहेत.