IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पहिले दोन T20 गमावलेली टीम इंडिया आजही हरली तर मालिका गमवावी लागेल. अशा परिस्थितीत हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरोपेक्षा कमी नाही.
वेस्ट इंडिजने पहिला टी20 चार धावांनी जिंकला. यानंतर दुसऱ्या टी-20मध्ये यजमानांनी दोन विकेट्स राखून विजय मिळवला. आता तिसरा टी20 जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाला सात वर्षांनंतर भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर मालिका पराभवाचा धोका टाळणे हे हार्दिक पांड्याचे लक्ष्य असेल.
या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन पूर्णपणे बदललेली पाहायला मिळू शकते. त्यामुळे संघात अनेक बदल होऊ शकतात, असे मानले जात आहे. तिसर्या टी-20 मध्येही आपल्याला नवीन सलामीची जोडी पाहायला मिळेल. त्याचबरोबर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि मुकेश कुमार यांनाही संघातून बाहेर केले जाऊ शकते.
यशस्वी जैस्वाल पदार्पण करू शकतो
स्फोटक युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला तिसऱ्या टी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतरच त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. तो पहिल्या चेंडूपासूनच फटके मारू शकतो. यशस्वीला पदार्पणाची संधी मिळाली तर तो ईशान किशनसोबत सलामी करू शकतो. त्यानंतर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.
Facebook Meta : …म्हणून फेसबुसची पॅरेंन्ट कंपनी मेटाला दररोज भरावा लागणार 82 लाखांचा दंड
टीम इंडियामध्ये अनेक बदल होऊ शकतात
भारतीय संघ तिसर्या टी20 मध्ये अनेक बदलांसह मैदानात उतरु शकतो. मुकेश कुमारच्या जागी आवेश खान किंवा उमरान मलिकला संधी दिली जाऊ शकते. रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवचे संघात पुनरागमन होऊ शकते.
हार्दिक आणि अर्शदीपला दुसऱ्या सामन्यात स्विंग मिळाला आणि दोघेही गोलंदाजीला सुरुवात करतील. दोन महिन्यांनंतर खेळणारा चहल प्रभावी ठरला, पण बिश्नोईला काही आश्चर्यकारक करता आले नाही. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने खूप धावा दिल्या, ज्याच्या जागी आवेश खान किंवा उमरान मलिकला मैदानात उतरवता येईल.
Video : लोकसभेत डोवाल अन् शाह काँग्रेसकडून टार्गेट; PM मोदींच्या चुप्पीची सांगितली कारणे
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
इशान किशन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन/अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.