Video : लोकसभेत डोवाल अन् शाह काँग्रेसकडून टार्गेट; PM मोदींच्या चुप्पीची सांगितली कारणे
Manipur Voilence Congress Attack On BJP : मणिपूरवरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरूच असून, याच मुद्द्यावरून आजपासून (दि. 8) लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना टार्गेट करत मणिपूर मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुप्पीची तीन कारणे सांगितली आहेत.
मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. काँग्रेसतर्फे खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली. तसेच पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत मणिपूरला का भेट दिली नाही, त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही, असे सवाल उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पंतप्रधानांच्या या मौनामागे तीन मुख्य कारणे असल्याचे सांगितले.
तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका
पंतप्रधानांच्या मौनामागची तीन कराणं?
पीएम मोदींच्या मौनामागे तीन कारणं असल्याचे गोगोई यांनी सांगितले. ते म्हणाले की, या मौनामागचे पहिले कारण म्हणजे राज्य सरकारचे अपयश होय. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ते स्वतः सांगत होते की, अशा शेकडो प्रकरणांची नोंद झाली आहे.त्यांच्या या विधानानंतर पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही? असा प्रश्नदेखील गोगोई यांनी उपस्थित केला.
आधी दादांचा फोटो हटवला, आता पवारांच्या सभेचे आयोजन; प्रशांत जगताप त्वेषाने मैदानात!
गोगोईंच्या निशाण्यावर डोवाल अन् शाह
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांवरही गोगोई यांनी फैलावर घेतले. घटना घडल्यानंतर गृहखाते आणि एनएसए काय करत आहेत असा प्रश्न विचारत मणिपूरमधील पोलिस ठाण्यांमधून शस्त्रे चोरीला जात आहेत, 5 हजारांहून अधिक धोकादायक शस्त्रे लोकांकडे असल्याचे ते म्हणाले. शहांनी मणिपूरला भेट दिली, शांततेबद्दल बोलले पण त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगत, 15 दिवसांत परत येऊ असे ते म्हणाले होते. पण ते अजून मणिपूरला परतलेले नाही.
तृणमूलला झटका! खासदार ओब्रायन राज्यसभेतून निलंबित; धनखड यांच्याबरोबरील वादाचा फटका
तिसरे कारण सांगताना गोगोई म्हणाले की, पंतप्रधान मोदींना त्यांची चूक मान्य करणे शक्य नाही. कारण ज्यांना मोदींनी मणिपूरचे मुख्यमंत्री केले तेच हे सर्व नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले पण मोदी हे मान्य करणार नाही. केवळ मणिपूरच नाही, तर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण असो किंवा कृषी कायद्याशी संबंधित प्रकरण असो, पंतप्रधानांनी तेव्हाही मौन बाळगून आपली चूक मान्य केली नसल्याचे गोगोई यांनी सांगितले. राहुल गांधींनी चीन, अदानी आणि इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले होते त्यावरही पंतप्रधान मौन बाळगून आहेत.
#WATCH | Congress MP Gaurav Gogoi says, "PM took a 'maun vrat' to not speak in the Parliament. So, we had to bring the No Confidence Motion to break his silence. We have three questions for him – 1) Why did he not visit Manipur to date? 2) Why did it take almost 80 days to… pic.twitter.com/rfAVe77sNY
— ANI (@ANI) August 8, 2023