Download App

Asia Cup 2023 : Mohammed Siraj ने 91 वर्षांचा इतिहास बदलला! एकाच षटकात घेतले 4 बळी

Asia Cup 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मागील 91 वर्षांचा इतिहासच बदलून टाकला आहे. एकाच षटकात मोहम्मदने (Mohmmad Siraj) 5 विकेट घेतले आहे. इतका वेगवान बळी घेणारा मोहम्मद (Mohmmad Siraj) भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आणि जगातला दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

आशिया चषकाचा अंतिम सामना आज श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पार पडला. आजच्या सामन्यात होमस्पीचवरच भारताने श्रीलंकेला धूळ चारली आहे. सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेचा हा निर्णय मैदानात फलंदाजीसाठी उतरचा फेल ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

Asia Cup 2023 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारतीय संघात कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री

भारताच्या बाजूने गोलंदाजीचा भेदक मारा करीत मोहम्मदने (Mohmmad Siraj) अवघ्या 15 चेंडूमध्ये सामन्यात एकूण 5 विकेट घेतले आहेत. एवढचं नाहीतर मोहम्मद (Mohmmad Siraj) तिसरे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने कर्णधार दासून शनाकाला घरचा रस्ता दाखवला. भारताने क्रिकेट विश्वात प्रवेश केल्यानंतर आत्तापर्यंत एकाही खेळाडूने असे विकेट घेण्याचा विक्रम केला नव्हता आज मोहम्मद सिराजने केला आहे. भारताने क्रिकेट विश्वात 1932 साली प्रवेश केला होता.

….त्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का?, उदयनिधींच्या वक्तव्यावर RSS चा थेट सवाल

जगभरात तीनच गोलंदाजांचा विक्रम आहे, की त्यांनी आत्तापर्यंत एकाच षटकात 4 विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने हा विक्रम केला होता. त्यानंतर मोहम्मद सामी, आदिल रशीद यांनी हा विक्रम केला होता. आता एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 5 बळी घेणारा सिराज पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या आहेत.

ममता बॅनर्जींसोबत सौरभ गांगुली स्पेन दौऱ्यावर; तिथूनच केली नव्या इनिंगची घोषणा

दरम्यान, जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच षटकात विकेट घेतली. यानंतर षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजने एकहाती लंकेचा धुव्वा उडवला. श्रीलंकेने 12 धावांत आपले 6 फलंदाज गमावले होते. त्याचवेळी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही वाहत्या गंगेत हात धुवून 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

भारताच्या वेगवान आक्रमणाने श्रीलंकेचा डाव अवघ्या 50 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या 6.1 षटकांत विजेतेपद पटकावले. शुभमन गिल आणि इशान किशन यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला.

Tags

follow us