….त्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का?, उदयनिधींच्या वक्तव्यावर RSS चा थेट सवाल
Manmohan Vaidya On Sanatan Dharm : सनातन धर्म (Sanatan Dharm) या मुद्द्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्या विधानावरून हा वाद सुरू झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने (BJP) त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. दरम्यान, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाहक मनमोहन वैद्य (Manmohan Vaidya) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक सुरू आहे. स.प. महाविद्यालयात ही बैठक सुरू आहे. यामध्ये देशभरातील 36 संघटनांचे 267 प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत बोलतांना मनमोहन वैद्य यांनी सनातन धर्मावर भाष्य केले. ते म्हणाले, सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणाऱ्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का? भारताची ओळख ही अनादी काळापासून आध्यात्मिक आहे. जे सनातन धर्माला विरोध करतात, त्यांना सनातन धर्म म्हणजे काय म्हणायचं हे विचारायला हवं, असं वैद्य म्हणाले.
आशिया कप महामुकाबला; कोण होणार चॅम्पियन? कोणाचे पारडे जड
राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारीत मकर संक्रांतीच्या सुमारास राम मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल, असंही त्यांनी सांगितलं.
सध्या देशात इंडिया आणि भारत हा वाद सुरू आहे. यावरही वैद्य यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, देशाचे नाव हे भारत राहिले पाहिजे. इतर कोणत्याही देशाला दोन नावे नाहीत. भारत हा एक प्रेरणादायी इतिहास, देशाला सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे. त्यामुळे देशाचे नाव भारत हेच असावे, अशी ठाम भूमिका वैद्य यांनी घेतली.
मणिपूर हिंसाचारावर बोलतांना वैद्य म्हणाले, मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असून यामध्ये तेथील सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. दोन समाजातील वाद मिटवण्याचे काम संघाचे कार्यकर्ते करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
या तीन दिवसीय बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात काय चर्चा झाली, याची माहिती वैद्य यांनी दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीत संघाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. या बैठकीत समृद्ध भारतासाठी काय करायला हवे यावर चर्चा झाली. 2020 मध्ये संघाच्या शाखा 38 हजार होत्या, 2023 मध्ये त्या वाढून 42 हजार झाल्या, अशी माहिती वैद्य यांनी दिली. दरवर्षी आम्हाला संघात सामील होण्यासाठी 1.5 लाखाहून अधिक विनंत्या येतात. यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक असल्याचं ते म्हणाले.