Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना नूकताच श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये पार पडला. या सामन्यात अवघ्या 37 बॉलमध्ये श्रीलंकेला धूळ चारत भारताने आठव्यांदा आशिया चषक पटकावला आहे. एवढंच नाहीतर भारताने हा सामना जिंकून क्रिकेट विश्वात एक नवा विश्वविक्रमच रचला आहे. या विक्रमामध्ये भारताने क्रिकेट विश्वातला दिग्गज संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.
Sublime 4️⃣
Timed to perfection by @ShubmanGill, bisecting the field & sending the ball to the fence.#TeamIndia's chase to the 🏆 is underway!
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/vepXPaLvmZ
— Star Sports (@StarSportsIndia) September 17, 2023
भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत भारताने हा दुसरा आशिया चषक पटकावला आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र, त्यांचा हा निर्णय फेल ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. अवघ्या 15.5 षटकांचा भेदक मारा करीत भारताने श्रीलंकेच्या संघाला तंबूत पाठवलं आहे. 15.5 षटकांमध्ये श्रीलंका संघ अवघ्या 50 धावा करु शकला आहे.
अंतिम सामन्यावर भारताची पकड इतकी मजबूत होती की, श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशातच भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सामन्यात आपली धमक दाखवत एकाच षटकात 4 फलंदाजांना माघारी पाठवत एक विक्रमच रचला आहे. मोहम्मदची एकदिवसीय सामन्यामधील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
….त्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहीत आहे का?, उदयनिधींच्या वक्तव्यावर RSS चा थेट सवाल
दुसऱ्या इनिंगमध्ये भारतासमोर श्रीलंकेने 50 षटकांत 50 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे सलामीचे फलंदाज इशान किशन आणि शुभमन गिल यांनी अवघ्या 37 बॉलमध्ये श्रीलंकेचं आव्हान गाठत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये शुभम गिलने 19 बॉलमध्ये 27 धावा तर इशान किशनने 18 बॉलमध्ये 23 धावा करुन विजय खेचला आहे.
India Alliance Rally : इंडियाची आघाडीची भोपाळमधील पहिलीच सभा रद्द; कमलनाथ यांची माहिती
मल्टिनेशन टूर्नामेंटमध्ये भारत हा कमीत कमी बॉलमध्ये अंतिम सामना जिंकणारा संघ बनला असून हा एक जागतिक विश्वविक्रमच भारताने रचला आहे. तसेच बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कमी बॉलमध्ये विजय मिळवण्याच्या यादीत ऑस्ट्रेलिया संघ होता. 2003 मध्ये, VB मालिकेच्या अंतिम सामन्यात 12.2 षटकांतच मैदान गाजवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 226 बॉल बाकी असताना इंग्लंडचा 10 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडचा संघ केवळ 117 धावाच करू शकला होता.
दरम्यान, कर्णधार म्हणून 2 आशिया चषक जिंकणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि एमएस धोनी यांनीही ही कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून धोनीने एकदा एकदिवसीय आणि एकदा टी-20 आशिया कप जिंकला तर रोहित आणि अझरुद्दीन यांनी प्रत्येकी दोनदा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे.