Download App

Asian Games 2023 : सिंगापूरला दणका! भारतीय संघाने मिळवला ऐतिहासिक विजय

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय (Asian Games 2023) खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाचाही कमाई केली. त्यानंतर आता पुन्हा गुडन्यूज मिळाली आहे. भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) विजयी वाटचाल कायम ठेवत सिंगापूरचाही (Singapore) दणदणीत पराभव केला. मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात हॉकी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत 16 गोल केले. प्रतिस्पर्धी सिंगापूरला फक्त 1 गोल करता आला. भारताने याआधीच्या उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही असाच पराक्रम केला होता. या सामन्यात 16 गोल करत विजय मिळवला होता. त्यानंतर आता सिंगापुरलाही तडाखा दिला. या स्पर्धेत भारताने दोन दिवसात 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई केली.

Asian Games 2023 : भारताने जिंकलं पहिलं गोल्ड मेडल, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मोडला चीनचाही रेकॉर्ड

सिंगापूर विरुद्धच्या सामन्यात मनदीप सिंह तीन गोल करत हॅट्रिक केली. त्याने सामन्याच्या 12,30 आणि 51 व्या मिनिटाला गोल केले. संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या चार गोल्सच्या जोरावर भारताने 16-1 अशा फरकाने विजय मिळवला. व्हीएस प्रसाद, गुरजंत सिंह, ललिलत कु्मार उपाध्याय, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह आणि अभिषेक यांनी दमदार कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये पाकिस्तानने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या संघाने 1978 मध्ये बांग्लादेशचा 17-0 असा पराभव केला. हा रेकॉर्ड तोडण्याची संधी भारताला होती. मात्र हा रेकॉर्ड तोडणे भारताला शक्य झाले नाही.

दरम्यान, याआधी भारत विरुद्ध उझबेकिस्तान सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी तीन गोल केले. या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय संघाचे नियंत्रण होते. सामना सुरू झाल्यानंतर सातव्या मिनिटाला ललित उपाध्यायने पहिला गोल केला. त्यानंतर आणखी एक गोल झाला. अशा प्रकारे सुरुवातीलाच टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली होती.

भारतीय नारी सब पे भारी! महिला संघाकडून लंकादहन; सुवर्णपदकावर कोरलं नाव

असं मिळालं पहिलं गोल्ड मेडल

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं खातं उघडलं. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. रुद्रांश पाटील, (Rudransh Patil) ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पंवार यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धा जिंकून भारताला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

Tags

follow us