Asian Games 2023 : भारताने जिंकलं पहिलं गोल्ड मेडल, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मोडला चीनचाही रेकॉर्ड

  • Written By: Published:
Asian Games 2023 : भारताने जिंकलं पहिलं गोल्ड मेडल, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मोडला चीनचाही रेकॉर्ड

Asian Games 2023 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये (Asian Games) भारताने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पाच पदकं जिंकली होती. त्यानंतर आता या स्पर्धेत भारताचं सुवर्ण पदकाचं (gold medal) खातं उघडलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी) भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने 2003 आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. रुद्रांश पाटील, (Rudransh Patil) ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पंवार यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धा जिंकून भारताला यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

https://x.com/ANI/status/1706133186735124530?s=20

रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पंवार आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांनी वैयक्तिक पात्रता फेरीत विश्वविक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली आहे. भारताने एकूण 1893.7 इतका स्कोअर केला, जो मागील महिन्यात बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेल्या जागतिक विक्रमापेक्षा 0.4 पाईंट्सनी अधिक आहे. या इव्हेंटनंतर चीन आशियन रेकॉर्ड आणि गेम्स रेकॉर्डच्या चार्टमधूनही बाहेर पडला आहे.

क्वालिफिकेशन राऊंडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रुद्राक्ष 632.5 गुणांसह टीमसाठी सर्वाधिक स्कोअर ठरणारा शुटर ठरला. त्यानंतर ऐश्वर्य 631.6 गुणांसह पाचव्या स्थानावर तर दिव्यांशचा अंतिम स्कोअर 629.6 इतका राहिला.

भारताची आतापर्यंतची कामगिरी
भारताने आतापर्यंत एका सुवर्णासह एकूण 7 पदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने 5 पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी पदक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी तीन रौप्य आणि दोन कांस्यांसह एकूण पाच पदके जिंकली होती. भारतासाठी पहिले पदक अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रोईंगच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल्समध्ये जिंकले.
महिलांच्या संघाने १० मीटर एअर रायफलमध्ये देशाला दुसरं पदक मिळवून दिलं. मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी रौप्य पदक जिंकले. बाबूलाल यादव आणि लेखराम यांनी जोडी रोइंग स्पर्धेत भारतीय संघासाठी तिसरे पदक (कांस्य) जिंकले. तर चौथे पदक रोईंग-8 मध्ये नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष आणि धनंजय उत्तम पांडे यांनी भारतासाठी रौप्य पदक जिंकले. रमिताने 10 मीटर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube