भारतीय नारी सब पे भारी! महिला संघाकडून लंकादहन; सुवर्णपदकावर कोरलं नाव

भारतीय नारी सब पे भारी! महिला संघाकडून लंकादहन; सुवर्णपदकावर कोरलं नाव

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय नारी सबपे भारीचं दर्शन पाहायला मिळालं आहे. आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करीत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करीत भारताने 117 धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेच्या संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 97 धावाच करु शकला. या विजयामध्ये भारताची वेगवान गोलंदाज तीतास साधूची महत्वाची भूमिका होती. तीतासने 4 षटकांत 6 धावा देत 3 बळी घेतले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघ पहिल्यांदाच क्रिकेट खेळत आहे. त्यामुळेच चीनच्या भूमीवर भारतीय मुलींनी क्रिकेटमध्ये इतिहास रचल्याचं बोललं जात आहे.

Chandrashekhar Bavankule यांची ‘विद्वत्ता’ समोर आलीय; ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंनी साधला निशाणा

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाला शेफाली वर्माच्या विकेटने पहिला धक्का बसला होता. त्यानंतर मंधाना आणि रॉड्रिग्समध्ये एकूण 73 धावांची महत्वाची भागीदारी झाल्याचं पाहायला मिळालं. सामन्यात मंधानाने 45 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 46 धावा केल्या आहेत. तसेच रॉड्रिग्सने 40 चेंडूत 42 धावा केल्या, यामध्ये तिने त्याने 5 चौकार मारले. या दोघांशिवाय दुसरी कोणत्याही खेळाडून आपली कामगिरी केली नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 116 धावा केल्या.

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाच्या इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधिनीने प्रत्येकी 2 गडी बाद केले. हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी शानदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 36 धावा काढल्या. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने हसिनीला बाद करून ही जोडी फोडून काढली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube