Australian Open 2024 : भारताचा दिग्गज टेनिस स्टार असलेल्या 43 वर्षीय रोहन बोपन्नाने (Rohan Bopanna ) शनिवारी ऐतिहासिक आणि दमदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनसह (Matthew Ebden) जेतेपद पटकावलं. 43 व्या वर्षी, ग्रँड स्लॅम दुहेरीचे विजेतेपद जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. रोहन-मॅथ्यू या जोडीनं इटालियन जोडी सिमोने आणि अँड्रियाचा 7-6 (7-0), 7-5 असा पराभव केला.
अखेर नाना पटोलेंना हायकमांडकडून मिळाली ‘पॉवर’ : काँग्रेस-वंचित आघाडी चर्चेची गाडी पुढे सरकणार?
याआधी बोपन्ना हा दोनदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 2013 आणि 2023 मध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती. मात्र विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. मात्र, रोहन बोपण्णाने अखेरीस ऑस्ट्रेलियन ओपन 2024 चे पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले. वयाच्या 43 व्या वर्षी, रोहन बोपन्नाने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आणि असा पराक्रम करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप
कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुहेरीची अंतिम फेरी गाठणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या यशस्वी जोडीला सिमोन बोलेल्ली आणि अँड्रिया व्हॅवासोरी यांचे आव्हान होते. बोपन्नाला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळं अंतिम फेरीपूर्वी त्याचे मनोबल नक्कीच उंचावलं. पहिल्या सेटमध्ये त्याची प्रचित पाहायाला मिळाली. बोपन्ना तरुण प्रतिस्पर्ध्यांना बॅकफूटवर ढकलत होता. तरीही हा सेट 6-6 असा बरोबरीत आला आणि टायब्रेकरमध्ये बोपन्नाने सहकारी एबडेनसह प्रतिस्पर्ध्यांचा 7-0 असा पराभव केला. बोपन्ना-एडबेन जोडीने पहिला सेट 7-6 (7-0) असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडीकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. आपापल्या सर्व्हिसवर गेम घेत हा सेट 5-5 अशा बरोबरीत आला होता. 11व्या गेममध्ये बोपन्ना आणि एडबेन या जोडीने इटालियन खेळाडूंची सर्व्हिस मोडून काढत 6-5 अशी निर्णायक आघाडी घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये बाजी मारून हे जेतेपद मिळवायचे होते. बापन्नाने सर्व अनुभव पणाला लावला आणि वयाच्या 43 व्या वर्षी त्याचा ग्रँडस्लॅम विजता ठरला.