अखेर नाना पटोलेंना हायकमांडकडून मिळाली ‘पॉवर’ : काँग्रेस-वंचित आघाडी चर्चेची गाडी पुढे सरकणार?

अखेर नाना पटोलेंना हायकमांडकडून मिळाली ‘पॉवर’ : काँग्रेस-वंचित आघाडी चर्चेची गाडी पुढे सरकणार?

मुंबई : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aaghadi) जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी याबाबत माहिती दिली. प्रदेश काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक धुळे येथे रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Congress has given the authority to state president Nana Patole to discuss seat allocation with the Vanchit Bahujan Aghadi.)

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. काही दिवसांपूर्वी  जागावाटपाबाबत होणाऱ्या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole) यांची सही होती.

जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी फडणवीस-अजित पवार का गेले नाहीत?, नाना पटोलेंचा थेट सवाल

मात्र नाना पटोले यांची सही पाहताच प्रकाश आंबेडकर यांनी पटोलेंना अधिकार नसल्याचे म्हटले होते. त्या पत्रावरुन बराच वादही झाला होता. काँग्रेस पक्षाने कोणासोबत युती करावी, कोणासोबत नाही, याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार नाना पटोले यांना नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. या पत्रामध्ये आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीचे निमंत्रणच नाकारले होते. तसेच आपल्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी पत्र पाठवून बैठकीसाठी बोलवावे अशी अट त्यांनी टाकली होती.

Maratha Reservation : ‘सरकारने जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ आणू नये’; राऊतांनी सुनावलं

मात्र आता रमेश चेन्नीथाला यांनी या चर्चांबाबतचे अधिकार नाना पटोले यांना असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरु असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात मविआ आणि देशात इंडिया आघाडी मजबूत असून काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री तसेच CWC सदस्यअशोक चव्हाण या तिघांवर वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे,असे ते म्हणाल होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज