जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी फडणवीस-अजित पवार का गेले नाहीत?, नाना पटोलेंचा थेट सवाल

  • Written By: Published:
जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी फडणवीस-अजित पवार का गेले नाहीत?, नाना पटोलेंचा थेट सवाल

Nana Patole : मराठा समाजाला आरक्ष (Maratha Reservation) मिळावं म्हणून मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगेंनी यांनी सरकारला अक्षरश: निर्णय घेण्यास भाग पाडल्यानंतर अध्यादेश जारी करण्यात आला. यात मराठा समाजासाठी जरांगेंनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. संभ्रम तयार करून मराठा समाजाची फसवणूक करणं योग्य नाही, अशी टीका पटोलेंनी केली.

सावधान! बिबट्या येतोय, वनविभाग झाला सतर्क; नागरिकांना महत्वाचं आवाहन 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर धुळ्यात पत्रकारांशी बोलतांना पटोले म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन संपलं आहे. पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. कोणाच्याही आरक्षणाशी धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. ओबीसीतून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने मान्य केली असेल तर ओबीसींची फसवणूक केलेली आहे. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, सरकारने केवळ अधिसूचना काढून हरकती मागवल्या आहेत. सरकारने आरक्षणाबाबत कोणताही अध्यादेश किंवा शासन निर्णय (जीआर) जारी केलेला नाही. खोटं बोलून संभ्रम तयार करून मराठा समाजाची फसवणूक करणं योग्य नाही, त्यामुळं सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असं पटोले म्हणाले.

अखेर नितीश कुमार भाजपसोबत जाणार! उद्या शपथविधी? ‘या’ कारणांमुळं धरली एनडीएची वाट 

ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी लढाई लढली. आपल्या मागण्या सरकारकडे पूर्ण करण्यासाठी त्यांना लाखो समर्थकांसह मुंबईत यावे लागले. सरकारचे प्रतिनिधी आणि जरांगे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सरकारने रात्री अधिसूचना जारी करून सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. सरकारला अशी अधिसूचना आधीही काढता आली असती, त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची सरकार वाट पाहत होते का? असा सवाल पटोलेंनी केला.

पटोले म्हणाले, मी ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणतात, पण या संपूर्ण घटनाक्रमात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कुठेच दिसले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. ओबीसी आरक्षणाला हात लावणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होतं, मग मराठा समाजाची ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे या मागणीचं काय झालं? मराठा समाजाला आरक्षण दिलं का? आणि दिलं असेल ते कुठून, हे सरकारने स्पष्ट करावे. सगळा संभ्रम तयार करून सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पटोलेंनी केली.

जातनिहाय जनगणना करा
आरक्षणाच्या नावाखाली सरकार फसवाफसवीचे राजकारण करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगेंनी आधीही आंदोलने झाली. मराठा समाजाने ५८ मोर्चे शांततेत काढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भूमिका आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असणा-या समाजाला आरक्षण दिले पाहिजे त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे हे महत्वाचे आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे व काँग्रेस पक्षाने सातत्याने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे. ३० जानेवारीपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे, या अधिवेशनात मोदी सरकारने यावर निर्णय घ्यावा म्हणजे मराठा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील, असे नाना पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube