Download App

NZ vs AUS:  कॅमेरुन ग्रीन-जोश हेझलवूडने दाखवला दम ! न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

10th wicket partnership between Cameron Green and Josh Hazlewood :  ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (NewZealand) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) आणि जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. या दोघांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियासाठी 10व्या विकेटसाठी (10th wicket partnership) कसोटी सामन्यात () सर्वात मोठी भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून 10व्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. 

PCMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

ग्रीन आणि हेझलवूडने आज जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) आणि ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) यांचा विक्रम मोडून काढला आहे. त्यांनी  2004 मध्ये ब्रिस्बेन येथे न्यूझीलंडविरुद्ध 10व्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली होती. 

‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा


अॅगर-ह्यूजच्या नावावर विक्रम

दुसरीकडे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी 10व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम ॲश्टन ॲगर (Ashton Agar) आणि फिल ह्यूज (Phil Hughes) यांच्या नावावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी 2013 मध्ये इंग्लडविरुद्ध तब्बल 163 धावांची भागीदारी केली होती. तर ऑस्ट्रेलियासाठी 10व्या विकेटसाठी 1924 मध्ये आर्थर अल्फ्रेड मॅली आणि जॉन मॉरिस टेलर यांनी 127 धावांची भागीदारी इंग्लंडविरुद्ध केली होती.
 
ग्रीनची अप्रतिम खेळी

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीनने चमकदार कामगिरी केली . या सामन्याच्या पहिल्या डावात तो चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना  275 चेंडूंत 23 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 174 धावा केल्या. तर दुसरीकडे 62 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने जोश हेझलवूडने 22 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडची स्थिती खूपच खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 115.1 षटकात 383 धावांवर आटोपला. यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 43.1 षटकांत 179 धावांत आटोपला. यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाकडे 204 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 13 धावांवर 2 विकेट गमावल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज