Champions Trophy 2025 : पुढील महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेनंतर पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने (Champions Trophy 2025) होणार आहेत. पाकिस्तानने मात्र आतापासूनच या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार का याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करत नाही. या गोष्टी माहिती असतानाही पाकिस्तानने स्पर्धेतील अन्य सामन्यांसह भारतीय संघाच्या सामन्यांसाठी ठिकाणे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने या स्पर्धांसाठी जो ड्राफ्ट तयार केला त्यानुसार भारतीय संघाचे सर्व सामने लाहोर शहरात (Lahore) खेळवण्याची योजना आखली जात आहे. अंतिम सामनाही याच शहरात आयोजित करण्याचा विचार सुरू आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने लाहोर शहर सोयीचे ठरेल अस विचार यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Pakistan Team : टीम इंडियाच्या विश्वचषकाचा ‘हिरो’, पाकिस्तानचा हेड कोच; PCB ने केलं कन्फर्म
भारतीय संघाची सुरक्षितता आणि प्रवासा दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी लाहोरचा विचार केला जात आहे. याचे दुसरे एक कारण म्हणजे लाहोर वाघा बॉर्डरच्या जवळ आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रवासाचा सोपा पर्याय राहिल. या शहराचा सध्या फक्त विचार सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. कारण या सर्व गोष्टी भारतीय संघाच्या प्रतिसादावर अवलंबून राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आठ संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाही. भारतीय संघाने तर मागील 17 वर्षांपासून एकदाही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का याबाबतही काहीच निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. या गोष्टी माहिती असतानाही पाकिस्तान बोर्डाने मात्र स्पर्धेच्या शेड्यूलचा ड्राफ्ट आयसीसीला पाठविल्याची माहिती आहे. या स्पर्धा पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात सुरू होऊ शकतात.
Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा