Australia vs India Champions Trophy Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) पहिला सेमीफायनलचा सामना भारत (India ) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दुबईत होत आहे.प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या (73) आणि अॅलेक्स कॅरी (61) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन, तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Half-centuries from Steve Smith and Alex Carey helped Australia set India a target of 265 in the first semi-final 🏏#ChampionsTrophy #INDvAUS ✍️: https://t.co/hFrI2t8AC9 pic.twitter.com/DiL9XB732c
— ICC (@ICC) March 4, 2025
धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरेलल्या ऑस्ट्रेलियाची म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. तीन ओव्हरमध्ये केवळ चार धावा झाल्या. मोहम्मद शमीने कूपर कोनोलीला शुन्यावर बाद केले. त्यानंतर ट्रेव्हिड हेड आणि कर्णधार स्टिव स्मिथने फटकेबाजी केली. त्यानंतर पाच ओव्हरमध्ये 49 धावा झाल्या. ट्रेव्हिड हेड हा धोकादायक होत असताना वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. तर कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली होती. परंतु दोन वेळेस तो बाद होताना वाचला. वरुण चक्रवर्तीच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे तो रन आऊट होण्यापासून वाचला. त्यानंतर पुढच्याच चेंडू विकेटला लागला. पण बेल्स पडल्या नाही. दोन जीवनदान मिळालेल्या स्मिथने 68 चेंडूत शतक झळकविले. 73 धावांवर खेळत असलेल्या स्मिथला मोहम्मद शमीने बोल्ड करत मोठा अडथळा दूर केला.
शेवटच्या पंधरा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखले
ऑस्ट्रेलियाच्या 36 ओव्हरमध्ये 4 बाद 195 धावा झाल्या होत्या. त्यामुळे हा संघ तिनशे धावांपर्यंत मजल मरेल. परंतु पुढच्याच दोन ओव्हरमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे बाद झाले. तर शेवटच्या चौदा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ 69 धावा करता आल्या. तर सहा विकेट्स गमविल्या. पण अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूत 61 धावांची खेळी केली. श्रेय्यर अय्यरच्या डायरेक्ट थ्रोवर कॅरी बाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.