Virat Kohli Retirement : भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाठोपाठ धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी (Virat Kohli) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. परंतु, त्याच्या () अचानक घेतलेल्या निवृत्तीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आताही एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. बीसीसीआय विराटला पुन्हा कर्णधार करण्याच्या विचारात होतं पण ऐनवेळी हा विचार सोडून देण्यात आला.
इंडिया टुडेनुसार विराट कोहलीला पुन्हा कर्णधार करण्याची हिंट बीसीसीआयने दिली होती. बॉर्डर-गावस्कर भारतीय संघाचा 3-1 ने पराभव झाला होता. या मालिकेतील अॅडलेड येथील कसोटीनंतर विराटला पुन्हा कर्णधार करणार असल्याची माहिती विराटला मिळाली होती. परंतु, अचानक परिस्थिती बदलली आणि हा संभाव्य निर्णय बारगळल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
या मालिकेत अॅडलेड कसोटीपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Australia) बरोबरीत होते. नंतर अॅडलेड कसोटीत टीम इंडियाचा (Team India) लाजिरवाणा पराभव झाला. आपण पुन्हा कर्णधार होऊ या विचाराने विराटने रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून सामना खेळला होता पण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताचा 3-1 अशा फरकाने पराभव झाल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली. त्यामुळे विराट पुन्हा कर्णधार होण्याच्या उरल्यासुरल्या शक्यताही मावळल्या.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर, इशान किशनसह ‘या’ स्टार खेळाडूला संधी
निवृत्तीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टावर विराट एक पोस्ट केली होती. विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी 14 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात.
मी या फॉरमॅटपासून दूर जातोय ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटत असल्याचे विराटनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी माझे सर्वस्व दिले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन असे म्हणत विराटने #269, साइनिंग ऑफ अशा शब्दांच त्याच्या निवृतीच्या पोस्टचा शेवट केला होता.
WTC फायनल इंग्लंड की भारतात? BCCI च्या गुगलीने पेच वाढला; आयसीसी काय निर्णय घेणार..