दोन महिन्यांआधीच रोहित घेणार होता निवृत्ती; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

दोन महिन्यांआधीच रोहित घेणार होता निवृत्ती; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Rohit Sharma Test Cricket Retirement : दिवस होता 7 मे 2025. वेळ सायंकाळी 7 वाजून 29 मिनीट. हाच वेळ साधून टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माने (Raohi Sharma) फक्त कप्तानीच नाही तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच जाहीर केली. यानंतर आता विविध रिपोर्ट समोर येत आहे. यात पीटीआयचा एक ताजा रिपोर्ट समोर आला आहे. यात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. तो असा की रोहित शर्मा दोन महिने आधीच निवृत्ती जाहीर करणार होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता. यामागे रोहितने नक्कीच काहीतरी विचार केला होता. आता प्रश्न असा आहे रोहितने त्यावेळी नेमका काय विचार केला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) 9 मार्च 2025 रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. या यशानंतर लगेचच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा रोहितचा विचार होता. रोहितच्या निकटच्या सूत्रांकडून पीटीआयला ही माहिती मिळाली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) नवी सायकल सुरू होणार होती. त्यामुळे निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार रोहितने केला होता. रोहितला वाटत होतं की नव्या सायकलमध्ये नवीन कर्णधार, युवा खेळाडू असावेत.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारताला मिळणार कसोटीमध्ये नवीन कर्णधार

रोहितने निवडकर्त्यांना केलं टेन्शन फ्री

जर रोहित स्वतःच निवृत्त होण्याचा विचार करत होता तर मग त्याला संघातून ड्रॉप करण्याचा मुद्दा पुढे का आला होता असा सवाल बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने उपस्थित केला. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती रोहितच्या निवडीवरून संभ्रमात होती. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा जवळ आलेला असताना रोहितला घ्यायचं की नाही असा प्रश्न या समितीसमोर होता. पण, याआधीच रोहितने निवृत्तीची घोषणा करून निवड समितीला टेन्शन फ्री केलं आहे.

चाहत्यांना विराट कोहली देणार धक्का? 

तर दुसरीकडे या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत विराट कोहलीने बीसीसीआयशी चर्चा देखील केली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बीसीसीआयकडून विराटने पुन्हा एकदा विचार करावा असा आवाहन करण्यात आला आहे. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

मला कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त व्हायचय; भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयला कळवलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube