Download App

चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात शिफ्ट होणार? भारताच्या मागणीवर पाकिस्तानचंही उत्तर

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे.

Champions Trophy in Pakistan : पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन (Champions Trophy) करण्यात येणार आहे. यावरून सध्या वाद सुरू आहेत. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही पाकिस्तानला खात्री (Pakistan) आहे की टुर्नामेंट पाकिस्तानातच होईल यासाठी क्रिकेट बोर्डाने तयारी सुरू केली आहे. कराची आणि लाहोर येथील मैदानावर नवीन फ्लड लाईट्स लावण्यात येणार आहेत. पाकिस्तान आणि भारतात अनेक वर्षांपासून तणाव आहे. अशात बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की भारत सरकारने मंजुरी दिल्याशिवाय क्रिकेट संघ  (Team India) पाकिस्तानात पाठवणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात शिफ्ट करावी अशी मागणीही बीसीसीआयने केली आहे.

पाकिस्तानने मात्र यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानात आणण्याचे काम आयसीसीचे (ICC) आहे त्यामुळे स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट करण्याचा प्रश्न नाही असे बोर्डाने सांगितले होते. या स्पर्धेची तयारी बोर्डाने सुरू केली आहे. पीटीआय वृत्त संस्थेनुसार पीसीबी कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे. या दोन्ही मैदानात या लाइट्स भाडोत्री पद्धतीने लावण्यात येणार आहे. क्वेटा, एबटाबाद, पेशावर येथील मैदानांवरही अशाच पद्धतीने लाइट्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Champions Trophy साठी पाकिस्तानला न येण्याचे परिणाम भोगावे लागणार; माजी क्रिकेटपटूचा भारताला इशारा

सध्या कराची येथील मैदानात सध्या ज्या लाइट्स आहेत त्या क्वेटा येथे पाठविण्यात येतील. तसेच लाहोर येथील लाइट्स रावळपिंडी येथे पाठविण्यात येतील. कराची आणि लाहोर येथे नवीन लाइट्स लावण्यात येतील. यासाठी बोर्डाने टेंडर कार्यवाही सुरू केली आहे. या मैदानांवर भाडोत्री पद्धतीने लाइट्स लावण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. हे टेंडर ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत असतील.

पाकिस्तानात होईल का चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफी वरून सुरू झालेला वाद अजून संपलेला नाही. कारण भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे स्पर्धा पाकिस्तानात होईल की नाही असा संशय निर्माण झाला आहे. मागील वर्षात आशिया कप (Asia Cup) वेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. बीसीसीआयने क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेने संयुक्त पद्धतीने आयोजित केला होता. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत (Sri Lanka) झाले होते.

Champions Trophy 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? बीसीसीआय म्हणतो, आमचे संबंध  

follow us