Download App

क्रिकेट जगतावर शोककळा, माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन

Bishan Singh Bedi : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बिशन सिंग बेदी 77 वर्षांचे होते आणि गेल्या शतकातील टीम इंडियाचे महान स्पिनर होते. बिशनसिंग यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. बिशनसिंग बेदी यांनी 1966 मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. पुढे 13 वर्षे ते टीम इंडियासाठी मॅचविनर ठरले. 1979 मध्ये निवृत्तीपूर्वी बिशनसिंग बेदी यांनी 67 कसोटी सामने खेळले. 28.71 च्या उत्कृष्ट सरासरीने 266 बळी घेतले. या काळात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे ते गोलंदाज होते.

1970 च्या दशकात फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध चौकडीचा बिशनसिंग बेदी (बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, राघवन) एक भाग होते. गोलंदाजीशिवाय बिशनसिंग बेदी यांच्याकडे नेतृत्व क्षमताही होती. बिशनसिंग बेदी यांची 1976 मध्ये टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी 1978 पर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून बिशनसिंग बेदी यांनी 1976 मध्ये वेस्ट इंडिजचा त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पराभव केला होता.

जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल

क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही बिशनसिंग बेदी यांचा खेळाशी संबंध राहिला. समालोचक म्हणूनही बेदींनी क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला. प्रशिक्षक म्हणूनही बिशनसिंग बेदी दीर्घकाळ क्रिकेटशी जोडले गेले. एवढेच नाही तर फिरकीला भारताला मजबूत करण्यासाठी बिशनसिंग बेदी यांनी नवीन खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि भारतीय क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले.
Salaar Poster Release: प्रभासच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट, सालार’चा फर्स्ट लूक Out

Tags

follow us