Download App

क्रिकेट विश्वात शोककळा! माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा निधन

David Johnson Died : भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि कर्नाटकचा वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा (David Johnson) निधन झाला आहे

  • Written By: Last Updated:

David Johnson Died : भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि कर्नाटकचा वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा (David Johnson) निधन झाला आहे. जॉन्सनने गुरुवारी (20 जुन) सकाळी बेंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला.  1996 मध्ये जॉन्सनने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने खेळले. याच बरोबर त्यांनी एकूण 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहे.

माहितीनुसार, आज सकाळी बेंगळुरूमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये डेव्हिड जॉन्सन मृतावस्थेत आढळले. त्यांचा त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ते 52 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. मात्र ही आत्महत्या आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन त्याच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडला असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यांना रुग्णलयात नेण्यात आले होते मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जॉन्सनने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे खेळाला होता मात्र त्यानंतर त्यांना भारतीय संघात स्थान मिळाला नाही. त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेपासून ते बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) पर्यंत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी एक्सवर जॉन्सनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी एक्सवर लिहिले की, माझा क्रिकेट दिवसांपासूनचा मित्र डेव्हिड जॉन्सन याच्या निधनाने मला खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. बेनी तू खूप लवकर निघून गेलास.

क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! T20 वर्ल्ड कपनंतर ‘या’ संघांविरुद्ध भिडणार टीम इंडिया, वेळापत्रक जाहीर

तर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी देखील जॉन्सनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एक्सवर लिहिले की, माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून संवेदना. त्यांचे खेळातील योगदान सदैव स्मरणात राहील.

follow us

वेब स्टोरीज