T20 World Cup 2024 WI vs NZ : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. आताही असाच एक उलटफेर झाला आहे. अटीतटीच्या सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर विंडीज संघाने सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पराभवामुळे न्यूझीलंडचं सुपर 8 फेरीतील प्रवेशाचं गणित डळमळीत झालं आहे. न्यूझीलंडचे आणखी दोन सामने बाकी आहेत मात्र तरीही संघाचा सुपर 8 मधील प्रवेश कठीण झाला आहे. या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला 150 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे न्यूझीलंडला शक्य झालं नाही. फक्त 13 धावांनी त्यांना हा सामना गमवावा लागला. प्रथम गोलंदजी करताना किवी संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला त्यामुळे वेस्टइंडिजला 149 धावांत रोखता आले. वेस्टइंडिजकडून शेरफोन रुदरफोर्ड वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
अमेरिकेचा पराभव करत टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक; सूर्यकुमार, अर्शदीप चमकले
रुदरफोर्डने 6 षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. ब्रँडन किंगने नऊ धावा केल्या. तर जॉन्सन चार्ल्स शून्यावर बाद झाला. निकोलस पूरनने 17 धावा केल्या. यानंतर आलेल्या रोस्टन चेस्ट आणि रोव्हमन पॉवेलला भोपळाही फोडता आला नाही. आंद्र रसेलने 14 धावांची भर घातली. रोमारियो शेफर्डने 13 तर अल्झारी जोसेफने 6 धावा केल्या. अशा पद्धतीने वेस्टइंडिजने 20 ओव्हर्समध्ये 149 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने तीन विकेट्स घेतल्या. तर टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. यानंतर विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.
न्यूयॉर्कमध्येही पाकिस्तानवर मात, टीम इंडियाचा 6 धावांनी थरारक विजय
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (T20 World Cup 2024) कायम आहे. काल झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव करत (IND vs USA) सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय संघाने आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत. आता सुपर 8 फेरीत (Team India) बलाढ्य संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. काल झालेल्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने भारताला 111 धावांचे माफक आव्हान दिले होते. भारताने हे लक्ष्य सहज गाठत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.