IND vs AUS 4th Test: आजपासून मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असणाऱ्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील (Border- Gavaskar Trophy 2024) चौथा सामना सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहयला मिळाली आहे. प्रेक्षकांनी नवीन रेकॉर्ड केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी विक्रमी 87,242 प्रेक्षक मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित होते. माहितीनुसार, चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाची तिकिटे सामन्याच्या दोन आठवडे आधी सोल्ड आऊट झाली होती.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टन्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 86 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने 65 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या, तर उस्मान ख्वाजाने 121 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने 145 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 72 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथ 111 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 68 धावांवर खेळत आहे. याचबरोबर कर्णधार पॅट कमिन्स देखील 8 धावांवर नाबाद आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतले, तर रवींद्र जडेजा, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1 वर आहे. या मालिकेचा पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता तर तिसरा सामना ड्रॉ झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियसशिपच्या फायनल सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज; कल्याण प्रकरणानंतर चित्रा वाघ संतापल्या…
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी ( यष्टीरक्षक ), पॅट कमिन्स ( कर्णधार ), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.