IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत बलाढ्य वाटणाऱ्या टीम इंडियाचा पाडाव केला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात फक्त भारतीय संघाचीच (Australia) नाही तर देशातील कोट्यावधी चाहत्यांची घोर निराशा केली. पराभवाचे हे दुःख अजूनही भारतीय लोकांना असह्य होत आहे. याच भावनेतून एका चाहत्याने थेट ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला (David Warner) चार शब्द सुनावले होते. मग काय वॉर्नरनेही या चाहत्याला उत्तर देत चक्क भारतीयांची माफी मागितली. त्याच्या माफी मागण्याचं कारणही खूप खास आहे. जे ऐकून तुम्हालाही भारताच्या पराभवाचं दुःख विसरल्यासारखं होईल.
World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन
या सामन्यातील भारताच्या पराभवानंतर चाहते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. विश्वचषकात जबरदस्त खेळ करत एकही सामना न गमावलेला भारताचा संघ फायनलमध्ये अत्यंत सुमार खेळला. त्यामुळे पराभव पदरी पडला. कोट्यावधी चाहत्यांची घोर निराशा झाली. अनेकांना अश्रू अनावर झाले. चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना तर सुनावलेच पण त्यांच्या रागातून ऑस्ट्रेलियन खेळाडूही सुटले नाहीत. अशाच एका चाहत्याने ट्विट करत वॉर्नर तू करोडो भारतीयांना नाराज केलं आहेस असं म्हटलं.
त्यानंतर खुद्द वॉर्नरनेच चाहत्याच्या या पोस्टला उत्तर दिलं. या ट्विटमध्ये वॉर्नर म्हणतो, मी तुमची माफी मागतो. हा खरंच चांगला खेळ होता. स्टेडियममधील वातावरण पाहण्यासारखं होतं. आपल्या सर्वांचे धन्यवाद.
I apologise, it was such a great game and the atmosphere was incredible. India really put on a serious event. Thank you all https://t.co/5XUgHgop6b
— David Warner (@davidwarner31) November 20, 2023
हेड-लाबुशेन ठरले विजयाचे शिल्पकार
भारताने 241 धावांचे दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS Final) सहाव्यांदा वर्ल्ड कप (World Cup 2023) पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 करत शतक झळकावले. मार्नस लाबुशेनने नाबाद 58 धावा करत अर्धशतक केलं. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून बुमराहने 2 विकेट घेतल्या. तर शमी आणि सिराजने 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ दिसले.
World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरवर गावसकर भडकले; नेमकं काय घडलं ?
रोहित शर्माला अश्रू अनावर..
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा भावनिक झाल्याचं दिसून आलं. स्पर्धेतील सगळ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मात्र तशी कामगिरी करता आली नाही. निराशाजनक कामगिरीचे फळ पराभवाच्या रुपात मिळाले.