Download App

IND vs AUS Final : मला बोलावलंच नाही! BCCI च्या कारभारावर कपिल देव नाराज

IND vs AUS Final : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल (IND vs AUS Final) मॅच सुरू आहे. सामना पाहण्यासाठी लाखो लोक हजर आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी, अभिनेतेही खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत. अनेक माजी खेळाडूही दाखल झाले आहेत नाहीत फक्त कपिल देव. 1983 मध्ये भारतीय संघाने त्यांच्याच नेतृत्वात विश्वकप जिंकला होता. पण, त्यांनाच या सामन्यासाठी आमंत्रण दिले नाही. खुद्द कपिल देव (Kapil Dev) यांनीच हा खुलासा एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव म्हणतात की भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अंतिम सामना पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नाही. मला तर वाटत होतं की आमच्या 1983 च्या संघातील प्रत्येकाला बोलवावं पण आता इतकं काम चाललंय. जबाबदाऱ्या वाढल्यात त्यामुळे कदाचित विसरले असतील असे कपिल देव म्हणाले. या व्हिडिओवर युजर्सही प्रतिक्रिया देत आहेत. तसं पाहिलं तर या सामन्यासाठी अनेक माजी खेळाडू येथे आले आहेत. त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, रणबीर सिंह, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती टीम इंडियाला प्रोत्साहन देताना दिसून आले. मात्र, माजी कर्णधार कपिल देव यांचं म्हणणं आहे की या सामन्यासाठी त्यांना आमंत्रितच करण्यात आलं नाही.

World Cup Final : बुमराह-शमीची भेदक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाची शंभरीकडे वाटचाल

भारताचे फलंदाज ढेपाळले 

विश्वचषक स्पर्धेचा (IND vs AUS Final) अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (IND vs AUS) 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक प्लान करून मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक फलंदाजासाठी वेगळे प्लान केला आला होता.

अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी किती निराशाजनक होती, याचा अंदाज 11 ते 40 षटकांमध्ये केवळ दोनच चौकार मारण्यात आल्याने लावता येतो. विश्वचषकाच्या सामन्यात अशा प्रकारची फलंदाजीची चाहत्यांनी अपेक्षा केली नसेल.

World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!

Tags

follow us