Download App

वादळी सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव गडगडला, ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे लक्ष्य

India Vs Australia 5th T20 : पाचव्या T20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर (IND vs AUS) विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 8 विकेट गमावत 160 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक धावा केल्या. श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

अखेरच्या षटकात नॅथन एलिसने श्रेयस अय्यरची विकेट घेतली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. टीम इंडियाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी 4.3 षटकांत 33 धावा जोडल्या. विशेषतः यशस्वी जैस्वाल खूपच आक्रमक खेळत होता.

वेगवान सुरुवातीनंतर भारतीय डाव गडगडला…
यशस्वी जैस्वालने 15 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकार मारले. पण चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने यशस्वी जैस्वालला आपला शिकार बनवले. यानंतर भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले.

Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट

55 धावांवर भारताचे 4 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये गेले होते. मात्र, श्रेयस अय्यर आणि जितेश शर्माने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण जितेश शर्मा 16 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. आरोन हार्डीने जितेश शर्माची विकेट घेतली.

कर्णधार सूर्यकुमार यादवशिवाय ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला.

BRS कडून फक्त जाहिरातीत गुलाबी चित्र, वास्तव समजल्याने जनतेने…; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

अशी होती ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, जेसन बेहरेन्डॉफ आणि बेन द्वारशुईस यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. याशिवाय आरोन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
प्रत्युत्तरात मैदाना उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. मुकेश कुमारने जोश फिलिपला बाद केले. जोश फिलिप 4 चेंडूत 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 षटकांनंतर 1 बाद 28 धावा आहे.

Tags

follow us