आशिया कपमधील सुपर चारमधील शेवटची लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवली जात आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्यामुळे अवघ्या 60 धावांत बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शाकिब अल हसन आणि तौहिद ह्दोय यांनी शानदार अर्धशतक झळकविले. त्यामुळे बांगलादेशला 265 धावांपर्यंत मजल मारली आहे. या सामन्याच्या निकालाचा आशिया चषकावर कुठलाही परिणाम होणार नाही. परंतु बलाढ्य असलेल्या भारतीय संघाला हा सामना जिंकणे महत्त्वाचा आहे.
पंडित नेहरूंनी सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले, मुनगंटीवारांचे पटोलेंना प्रत्युत्तर
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशने 50 षटकांत आठ बाद 265 धावा केल्या आहेत. कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावांचे योगदान दिले आहेत. तर तौहिद हृदोयने 54 आणि नसूम अहमदने 44 धावांची खेळी केली आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले आहेत. प्रसिध्द कृष्णा, अक्षर आणि जडेजाने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला आहे. तर जडेजाच्या नावावर एक विक्रम नोंदविला आहे. जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे गडी बाद करण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.
राणा दाम्पत्य, यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी; आवार घाला थेट देवेंद्र फडणवीसांनाच सवाल !
अष्टपैलू जडेजा याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 181 सामन्यांमधील 123 डावांमध्ये 2, 578 धावा केल्या आहेत. कपिल देव यांच्यानंतर जडेजाने भारताकडून दोन विकेट व दोन हजार धावा काढण्याचा विक्रम केला आहे. कपिल देव यांनी एकदिवसीय कारकिर्दीत 221 सामने खेळताना 253 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीत 3783 धावा काढल्या आहेत. 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकासाठी लढणार आहे.