Download App

Ind Vs Ire : भारताचा विजय; 2.0 ने आयर्लंडवर मात, हरमनप्रीत सिंहची चांगली कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडवर 2.0 ने मात करत विजय मिळवलायं.

Ind Vs Ire : भारतीय पुरुष हॉकी संघाचा आयर्लंडविरोधात सामना रंगला. भारताने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून तिसरा सामन्यातही भारताने आयर्लंडवर (Ind Vs Ire) 2.0 ने मात केलीयं. या सामन्यात भारताने 2 गोल करुन आयर्लंडचा पराभव केलायं. याआधी पहिला सामना भारताने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 3-2 असा जिंकला तर दुसरा सामना अर्जेंटिनाविरुद्ध 1-1 असा बरोबरीत सुटला.

शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान

पहिल्या हाप वेळेत भारताने आयर्लंडवर गोल करुन पहिली आघाडी घेतली. त्यानंतर हरमनप्रीतने शेवटी पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. चेंडू त्याच्या स्टिकवरून आल्यानंतर विरोधी संघातील एकाही खेळाडूला संधी मिळाली नाही. हरमनप्रीतच्या गोलनंतर भारताची आघाडी 2-0 अशी होती. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील त्याचा हा चौथा गोल आहे. भारतीय हॉकी संघाला पुन्हा एकदा पदक जिंकण्याची ही उत्तम संधी आहे.

Video : आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेत ट्विस्ट; पंकजांच्या भेटीने समीकरणं बदलणार?

हरमनप्रीतला ग्रीन कार्ड :
मनदीप सिंगने भारताला पॅनल्टी कॉर्नर दिला. सामन्याला फक्त 10 मिनिटे बाकी असतानाच हरमनप्रीत सिंगला ग्रीन कार्ड दाखविण्यात आल्याने त्यांची संधी हुकली. सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आल्याने आणखी अडचणीचा सामना करावा लागला. वॉल्शचा शॉट अमित रोहिदासच्या पायाला लागल्याने आयर्लंडला आणखी एक पीसी मिळाला होता. पहिला पेनल्टी कॉर्नर हुकला आणि त्यांना मिळालेला दुसरा पेनल्टी कॉर्नरही हुकल्यामुळे भारताची आणखी एक गोलची संधी हुकली. तर ललित दुसऱ्या क्रमांकावर असताना भारताने आक्रमणाची सुरुवात केली. पेनल्टी कॉर्नर मिळवला पण त्याचा काहीही परिणाम झाल्याचं दिसलं नाही.

follow us