IND vs WI: भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिलक वर्माने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्याने 2 षटकार मारले. इशान किशनने 23 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराश केले
सलामीवीर शुभमन गिलशिवाय संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजांनी निराशा केली. शुभमन गिलने 9 चेंडूत 7 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव 3 चेंडूत 1 धावा काढून धावबाद झाला. त्याचवेळी संजू सॅमसनने 7 चेंडूत 7 धावा केल्या.
‘देवेंद्रजी, किती ओझी वाहणार? मला दया येतेयं’, उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका…
वेस्ट इंडिजची चांगली गोलंदाजी
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ओबेद मॅकॉय आणि जेसन होल्डर यांना 2-2 अशा विकेट घेतल्या. तर अल्झारी जोसेफ आणि रोमिरिओ शेफर्डने 1-1 विकेट घेतली. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय संघाला पहिला धक्का 16 धावांच्या स्कोअरवर बसला. 18 धावांवर दुसरा धक्का बसला.
Cops Suspended In Pune : …म्हणून पोलिस उपायुक्तांनी 3 पोलिसांनी केलं निलंबित
टीम इंडियाचे 4 खेळाडू 76 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाला 152 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, भारतीय गोलंदाज कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे. तर कॅरेबियन संघ हा सामना जिंकून 2-0 अशी आघाडी घेऊ इच्छितो.