‘देवेंद्रजी, किती ओझी वाहणार? मला दया येतेयं’, उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका…
Udhav Thackeray Vs Devendra Fadnvis: देवेंद्रजी किती ओझी वाहणार? मला दया येतेयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुंबईत आज संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Udhav Thackeray Critisize Dcm Devendra Fadnvis)
उद्धव ठाकरे म्हणाले, उंट तर आहेतच पण दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढवेदेखील आहेत. चित्रपटातील गाण्याप्रमाणेच कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, देवेंद्रजी तुमची दया येते, आणखीन किती ओझे वाहणार? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.
Poet Gaddar Death : प्रसिद्ध गायक गुम्मडी विठ्ठल राव उर्फ गदर यांचं निधन!
आधी एक जाहिरात येत होती. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. एक चढला की दुसरा चढतोयं, तुम्ही काय आता गोविंदांचा थर लावता काय. किती उपमुख्यमंत्री करतायं. आधी एक पक्ष चोरला, आता दुसरा चोरला आता तर काँग्रेस फोडताहेत, आणखी किती उपमुख्यमंत्री करणार आहात. नंतर देवेंद्र फडणवीस मंस्टरमंत्रीच राहणार असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला आहे.
‘भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात आनंद’; वडेट्टीवारांचा घणाघात…
तसेच आता भाजपात काही राम राहिलेला नाही. सगळ्या आयारामांचा पक्ष झाला आहे. तुम्ही राम मंदिर बांधा पण आज तुम्ही आयारामांची पूजा करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या विविध विषयांवर भाष्य करीत सत्ताधारी पक्षाला चांगलचं धारेवर धरलं आहे. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडसह ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.