India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये सुरु असणारा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे थांबला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. पावसामुळे खेळ थांबल्यापर्यंत 11.5 षटकांनंतर भारताची धावसंख्या 3 बाद 37 आहे.
सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) 8 धावांवर बाद झाला, तर विराट कोहली (Virat Kohli) एकही धाव न घेता बाद झाला. कर्णधार शुभमन गिलनेही 10 धावा केल्या. जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अक्षर पटेल श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे. आता हा सामना 49 ओव्हरचा होणार आहे. पाावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यवर बाद होणारे खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या नंबर आहे. तो आतापर्यंत 39 वेळा शुन्यवर बाद झाला आहे. या यादीमध्ये झहीर खान पहिल्या नंबरवर असून तो 43 वेळा शुन्यवर आऊट झाला आहे. तर रोहित शर्मा आतापर्यंत 34 वेळा शुन्यवर आऊट झाला आहे.
We have another rain delay here in Perth.#AUSvIND pic.twitter.com/0oTwbZggpe
— BCCI (@BCCI) October 19, 2025
भारतीय संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन! शिंदे आघाडीवर, अजित पवार पिछाडीवर… बर्गेंचा मिश्कील टोला
ऑस्ट्रेलिया संघ
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड