Download App

India vs Bangladesh: …तरी कसोटी खेचून आणण्याचा आमचा प्रयत्न; बांगलादेशच्या कर्णधाराचा इशारा

भारत आणि बांगलादेश 2 कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. बांगलादेशी खेळाडूंच भारतात जोरदार स्वागत.

  • Written By: Last Updated:

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यानंतर 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ कानपूरमध्ये आमनेसामने येतील. याचदरम्यान नझमुल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू पहिल्या कसोटीसाठी चेन्नईला पोहोचले आहेत. बांगलादेशी खेळाडूंना चेन्नईत विशेष सुरक्षा पुरवली जात आहे.

फक्त 0.01 मीटरने विजेतेपद हुकलं, या दुखापतीने नीरज हैराण; हरल्यानंतरही मिळाले लाखो रुपये..

बांगलादेशी खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नझमुल हसन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राहतील आणि प्रोटोकॉलनुसार सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तेथे उपस्थित असतील. वास्तविक बांगलादेश गेल्या महिन्यापासून अशांततेच्या काळातून जात आहे. मात्र, असे असतानाही बांगलादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर आता बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

फक्त घोषणा अन् जाहिरातबाजी प्रत्यक्षात मात्र..,; प्राजक्त तनपुरेंनी जुनं सगळं उकरुन काढलं

भारताला रवाना होण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसैन शांतोने आपल्या रणनीतीवर प्रतिक्रिया दिली. नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे, टीम इंडियाची क्रमवारी आमच्यापेक्षा चांगली आहे, याबाबत आम्हाला कल्पना आहे. परंतु आमचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत कसोटी खेचून आणण्याचा आणि भारतीय संघाला सहज जिंकू न देण्याचा असेल. सामन्याचा निकाल शेवटच्या सत्रात यावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही फार दूरचा विचार करत नाही, पण भारताविरुद्ध जिंकण्याच्या मानसिकतेने आम्ही मैदानात उतरु, असा इशारा हुसेन शांतेने दिला.

follow us