Download App

Ind Vs Eng : पहिल्या T-20 सामन्यात भारताचा पराभव; ब्रिटीश महिलांनी 38 धावांनी नमवलं

Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (India Vs England) पहिला सामना आज वानखेडेवर खेळला गेला. T20 सामन्यात ब्रिटीश महिलांना भारतीय महिलांना नमवलं आहे. इंग्लंडने भारताचा 38 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 159 धावा करू शकला आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना भुलविणाऱ्या UPSC कोचिंग इस्टिट्यूट्सचा बाजार उठणार

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 197 धावा केल्या. नॅट सिव्हर ब्रंटने 77 आणि डॅनियल व्याटने 75 धावा केल्या. तर, अॅमी जोन्सने 9 चेंडूत 23 धावांची खेळी केली. भारताकडून रेणुका सिंगने तीन बळी घेतले. तर श्रेयंका पाटीलच्या नावावर दोन विकेट्स होत्या. इंग्लडने धुव्वाधार खेळी करत भारताला 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

ईडीचे धाडसत्र! दादरमधील प्रसिध्द साडीचे दुकान भरतक्षेत्रवर छापा, इतर पाच ठिकाणीही झाडाझडती

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, स्मृती मानधना 6 धावा करून बाद झाली. तर जेमिमा 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली होती. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 26 धावांचा पल्ला गाठला आहे. तर शेफाली वर्माने अर्धशतक झळकावत 52 धावांची खेळी केली. भारतीय संघ फलंदाजी करताना इंग्लडच्या सोफी एक्लेस्टोनने तीन विकेट घेतल्या आहेत.

Gurupatwant Singh Threat : ‘माझ्या हत्येचा कट फसला पण आता’.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

शेफाली वर्मा 52 धावा करून बाद झाली, त्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कनिष्क आहुजाला पाठिंबा देण्यासाठी पूजा वस्त्राकर मैदानात उतरली आहे. त्यानंतर भारताची चौथी विकेट गेली होती, रिचा घोष २१ धावा करून बाद झाली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर २६ धावा करून बाद झाली. आणि भारताला तिसरा धक्का बसला. शेफाली वर्मा तेव्हा क्रीजवर होती तर रिचा घोष फलंदाजीला आली होती. दरम्यान, या T20 मालिकेचा दुसरा सामना 9 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

Tags

follow us