Kapil Dev On Team India : भारतीय संघाला दोन प्रशिक्षकांची गरज? कपिल देव म्हणतो, प्रत्येकाला पैसे…

Kapil Dev On Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय

Kapil Dev On Team India

Kapil Dev On Team India

Kapil Dev On Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 51 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारतीय संघाच्या या पराभावानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहाते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर चारही बाजून टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता भारतीय संघाल कसोटी आणि व्हाईट बॉलसाठी दोन प्रशिक्षकांची गरज आहे अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तर या प्रकरणात आता भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी देखील प्रतिक्रिया देत मत मांडले आहे.

सध्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असून नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. तर एकदिवसीय सामन्यात भारताने आफ्रिकेवर 2-1 ने (IND vs SA) विजय मिळवला होता. त्यामुळे आता भारतीय संघाला दोन प्रशिक्षकांची गरज आहे अशी मागणी होत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय संघासाठी जे चांगले आहे ते केले पाहिजे असं म्हटले आहे. तसेच भारतीय क्रिकेटच्या हिताची निर्णय घेण्याची जबाबदारी बीसीसीआयवर आहे. बीसीसीआय यावर योग्य उत्तर देऊ शकते असं कपिल देव यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी देशासाठी खेळण्यापेक्षा टी-20 लीग पसंत करणाऱ्या खेळाडूंबद्दलही आपले मत व्यक्त केले.

कपिल देव म्हणाले की, प्रत्येकाला पैसे आवडतात, परंतु काही खेळाडूंना ते अधिक महत्त्वाचे वाटते. मी अजूनही असे मानतो की भारतासाठी खेळणे हे आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येकजण वेगळा आहे, त्यांचे स्वतःचे दृष्टिकोन आहेत. त्यांना शुभेच्छा.

भाजप- शिवसेना एकत्र लढणार महापालिका निवडणूक; शिंदेंसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर मोठा निर्णय

तर दुसरीकडे दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना 51 धावांनी जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे.  नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्यासाठी वाईट ठरला कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 213 धावा केल्या. याचा पाठलाग करताना, भारतीय संघाने विकेट गमावत राहिले आणि तिलक वर्माच्या 62 धावांच्या दमदार खेळीनंतरही संघ केवळ 162 धावांवर ऑलआउट झाला आणि 51 धावांनी पराभव पत्करावा लागला.

Exit mobile version