Download App

Kuldeep Yadav : कुलदीपच्या पंजात आफ्रिकेचा निम्मा संघ; खास कामगिरी करणारा पहिलाच फिरकीपटू

Kuldeep Yadav : टीम इंडियाने काल शानदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA) संघाला धूळ चारली. दमदार फलंदाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी असं मिश्रण जुळून आलं आणि आफ्रिकेचा पराभव करण्यात यश मिळालं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या यशात फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोठा वाटा राहिला. या सामन्यात कुलदीपने मोठा इतिहास रचला. त्याने फक्त 2.5 ओव्हरमध्ये 17 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला.

या विजयानंतर तीन टी 20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या सामन्यात कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये निम्मा संघ बाद करण्याची कामगिरी कुलदीपने दुसऱ्यांदा केली आहे. याबरोबरच भारताकडून टी 20 मध्ये दोनवेळा निम्मा संघ बाद करणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. विशेष काल कुलदीपचा वाढदिवस होता. या वाढदिवशी त्याने दमदार कामगिरी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

IND vs SA सूर्यकुमारचे आफ्रिकेत ‘तुफान’ शतक झळकवत केला मोठा पराक्रम

कुलदीप यादवला रवींद्र जडेजाने 2 विकेट घेत साथ दिली. सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याच्या ऐवजी या सामन्यात रवींद्र जडेजाने कर्णधारपद सांभाळले. अर्शदीप सिंग, मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. फलंदाजीत भारताकडून सूर्यकुमार यादवने तडाखेबंद शतक ठोकले. तर यशस्वी जयस्वालनेही दमदार फलंदाजी करत 60 धावा केल्या.

सूर्यकुमारचे शानदार शतक 

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत शानदार शतक झळकविले. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अवघ्या 55 चेंडूत शतक झळकवत आपल्या टी-20 कारकीर्दीतील चौथे शतक झळकविले. या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 201 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आफ्रिकेचे फलंदाज झटपट बाद करत मोठा विजय साकारला.

Tags

follow us