Download App

Michael Slater News : ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू पुन्हा वादात, घरगुती अत्याचारासह 19 गुन्हे दाखल

  • Written By: Last Updated:

Michael Slater News :  ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू  मायकेल स्लेटर (Michael Slater) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मायकेल स्लेटरवर घरगुती अत्याचारासह 19 गुन्ह्यांचा आरोप झाल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज (15 एप्रिल) रोजी  मारूचीडोर मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणात सुनावणी झाली.

ESPNcricinfo नुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू  मायकेल स्लेटरवर बेकायदेशीरपणे पाठलाग करणे, धमकावणे आणि कौटुंबिक अत्याचार प्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत तर जामीन आणि घरगुती हिंसाचाराच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या दहा गुन्ह्यांचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित घरगुती हिंसाचाराच्या घटनांनंतर माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटर  शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.  तर स्लेटरने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (16 एप्रिल) न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्याला सुनावणी होईपर्यंत कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे.

स्लेटरची कारकीर्द

ऑस्ट्रेलियासाठी  स्लेटरने 1993 च्या ऍशेस दौऱ्यात पदार्पण केला होता. स्लेटरने ऑस्ट्रेलियासाठी 74 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये 14 शतकांसह 42.83 च्या सरासरीने त्याने  5312 धावा केल्या. तर 42 एकदिवसीय सामन्यात त्याला ऑस्ट्रेलियाकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

ज्यामध्ये त्याने  24.07 च्या सरासरीने 987 धावा केल्या. त्याने पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले मात्र त्यानंतर पुढील अर्धशतकासाठी त्याला 29 डावांची प्रतीक्षा करावी लागली. 2004 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि टीव्ही कॉमेंट्री करिअरला सुरुवात केली.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज