Mohammed Shami Life Story: जर मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडले असते. तीनवेळा आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला. (India Vs New Zealand) माझे घर 24 व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला भीती होती की, मी आमच्या इमारतीवरून उडी मारेन, हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami). हा तो काळ होता जयावेळेस तो आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थिचा सामना करत होता. पण काही दिवसानंतर अडचणी कमी झाल्या आणि शमीने एक नवीन आयुष्य जगण्यास सुरुवात केली. आज संपूर्ण देश शामीच्या गोलंदाजीची प्रशंसा करत आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत 7 विकेट्स घेत शामीने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तो एकदिवसीय विश्वचषकात चौथ्यांदा 5 विकेट घेणारा उत्तम गोलंदाज ठरला आहे. शिवाय त्याच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. विश्वचषकात 50 विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न
इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शामीसाठी अजिबात सोपा नव्हता. शामी गेल्या काही वर्षांपासून अनेक आरोप आणि संकटाचा सामना करत होता. हीच वेळ होती जेव्हा त्याने एकदा नव्हे तर तीनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शामी 2015 च्या विश्वचषकानंतर दुखापतीतून परतत होता, पण त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे मोठ्या गोंधळात अडकला होता. मात्र नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं. त्याला त्याच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्याने आपल्या वाईट संघर्षातून लढा देत इथपर्यंत पोहोचला आहे.
इंस्टाग्राम लाईव्हवर या गोष्ट सांगितली
2020 मध्ये कोरोनाच्या काळात रोहित शर्मासोबतच्या इंस्टाग्राम लाइव्हमध्ये शामीने आत्महत्येचा विचार केल्याची कबुली दिली होती. 2015 च्या विश्वचषकात जखमी झालो होतो. त्यानंतर संघात परतण्यासाठी मला 18 महिने लागले आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता. त्यानंतर कौटुंबिक समस्या चालू होती आणि त्या दरम्यान IPL च्या 10-12 दिवस आधी मोठा अपघात झाला. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक वेगवेगळी चर्चा सुरु होती.
“मला वाटतं की त्यावेळी जर माझ्या कुटुंबाचा पाठिंबा नसता तर मी क्रिकेट सोडून दिलं असतं. मी तीनदा आत्महत्येचा विचारही केला होता. माझ्या कुटुंबातील कोणीही माझ्यावर लक्ष ठेवू नये, अशी माझी इच्छा होती. माझे घर 24व्या मजल्यावर होते आणि त्यांना भीती वाटत होती की मी इमारतीवरून उडी मारेन.
‘कुटुंब सोबत नसते तर…’
“माझे कुटुंब माझ्यासोबत होते आणि यापेक्षा मोठी ताकद कोणतेही असू शकत नाही. नेहमी घराचे मला सांगत होते की, प्रत्येक संकटावर उपाय असतो आणि फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर. तू ज्यात चांगले आहेस त्यात आणखी प्रयत्न कर. त्यामुळे मी सर्व विचार मागे टाकून नेटमध्ये गोलंदाजी करत होतो. मी पळण्याचा सराव करत होतो. मला कळत नव्हते की, मी काय करतोय. माझ्यावर दबाव होता. सरावाच्या वेळी मला खूप वाईट वाटायचे.
झहीर खानचा विक्रम मोडला
मोहम्मद शमीने बुधवारी मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एकदिवसीय विश्वचषकाच्या एका हंगामात एका भारतीयाने घेतलेल्या सर्वाधिक विकेटचा झहीर खानचा विक्रम मोडला आहे. किवी संघाविरुद्ध 57 धावांत 7 बळी घेणाऱ्या शमीने या स्पर्धेतील 6 सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. सोबतच त्याने 2011 च्या विश्वचषकात झहीरचा 21 बळींचा विक्रम मागे टाकला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य फेरीत मोहम्मद शमीची गोलंदाजी 9.5- 57-7 अशी होती. भारताची वनडे इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
वनडेमध्ये भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी
7/57 – मोहम्मद शमी विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई, 2023 विश्वचषक
6/4 – स्टुअर्ट बिन्नी विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2014
6/12 – अनिल कुंबळे विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता, 1993
6/19 – जसप्रीत बुमराह विरुद्ध इंग्लंड, ओव्हल, 2022
6/21 – मोहम्मद सिराज विरुद्ध श्रीलंका, कोलंबो RPS, 2023
भारतासाठी यापूर्वीचा वर्ल्ड कप रेकॉर्ड आशिष नेहराच्या नावावर होता, नेहराने 2003 मध्ये डरबनमध्ये इंग्लंडविरुद्ध 6/23 अशी कामगिरी केली होती.
‘देव हा सर्वोत्कृष्ट…’, विराटचं ऐतिहासिक शतक अन् अनुष्काची Insta Story… पतीसाठीची पोस्ट चर्चेत
विश्वचषकात प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन (किंवा अधिक) 5 बळी
2 – मिचेल स्टार्क विरुद्ध न्यूझीलंड
2 – मोहम्मद शमी विरुद्ध न्यूझीलंड
विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स
27 – मिचेल स्टार्क (2019)
26 – ग्लेन मॅकग्रा (2007)
23 – चामिंडा वास (2003)
23 – मुथय्या मुरलीधरन (2007)
23 – शॉन टेट (2007)
23 – मोहम्मद शमी (2023)
भारतासाठी मागील विक्रमः 21- झहीर खान (2011)
विश्वचषक सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी
7/15 – ग्लेन मॅकग्रा (ऑस) वि एनएएम, पॉचेफस्ट्रूम, 2003
7/20 – अँडी बिचेल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, गकेबरहा, 2003
७/३३ – टिम साउथी (न्यूझीलंड) विरुद्ध इंग्लंड, वेलिंग्टन, २०१५
7/51 – विन्स्टन डेव्हिस (वेस्ट इंडीज) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स, 1983
७/५७ – मोहम्मद शमी (भारत) विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई वानखेडे, २०२३
मागील WC नॉकआउट रेकॉर्ड: 6/14 द्वारे गॅरी गिलमर (AUS) विरुद्ध इंग्लंड, लीड्स, 1975
विश्वचषकात सर्वाधिक 5 बळी
4 – मोहम्मद शमी
3-मिचेल स्टार्क
विश्वचषकाच्या एका मोसमात 3 वेळा 5 बळी घेणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे.