IND vs NZ : ‘बिग बी, तुम्ही फायनल पाहूच नका’; ‘त्या’ ट्विटनंतर चाहत्यांची विनंती, नेमकं काय घडलं?
IND vs NZ : भारताने वर्ल्ड-कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर (Ind vs NZ) 70 रन्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळी आणि शमीच्या सात विकेट्सच्या मोबदल्यात भारताने हा विजय नोंदविला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर फायनलमध्ये जाण्याचं न्यूझीलंडचं स्वप्न भंगलं आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी यांचं एक ट्विट खास चर्चेत आहे. टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर बिग बींनी मोजकंच ट्विट केलं पण, चाहत्यांनी त्यांना थेट भारताचा पुढील फायनल सामना तु्म्ही पाहू नका, अशी विनंतीच करून टाकली.
Ind vs NZ : भारताने सबका बदला घेतला! 2019 च्या पराभवाचा वचपा काढत फायनलमध्ये एन्ट्री
अमिताभ बच्चन यांचं क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. चित्रपटाचं शुटिंग असो किंवा दुसरं एखादं काम असो, बिग बी वेळात वेळ काढून सामना पाहतात. भारतीय संघाला प्रोत्साहनही देतात. परंतु, कालचा सामना त्यांनी पाहिला नाही. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी मोजक्याच शब्दांत एक ट्विट केलं होतं. मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा तो सामना भारत जिंकतो, अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलं होतं. मात्र त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मिश्किल टिप्पणी करण्यास सुरुवात केली. असे जर असेल तर आता तुम्ही फायनलचा सामना पाहू नका, अशी विनंती क्रिकेट चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना केली.
T 4831 – when i don't watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023
सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने संघाला तुफानी सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्या ओव्हरपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. दोघांनीही 8 ओव्हर्समध्ये 70 धावा फटकावल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात नवव्या ओव्हरमध्ये रोहित 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि शुभमनने धावफलक हालता ठेवला.
79 धावांववर असताना शुभमन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर श्रेयस अय्यरला हाताशी धरत विराट आणि श्रेयसने 210 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने सुत्र हातात घेतली आणि त्यानेही शानदार शतक झळकावले. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही शानदार खेळी केली. 50 ओव्हर्सनंतर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. न्यूझीलंडची सुरुवात काहीशी खराब झाली. शमीनेच या दोघांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर भारतीय गोलंदाजीच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यानंतर भारताने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.