NZ vs IND 2026 : BCCI ची मोठी घोषणा; 6 वर्षांनंतर ‘या’ देशात कसोटी खेळणार भारतीय संघ

NZ vs IND 2026 : भारतीय संघ ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी20, पाच एकदिवसीय

NZ Vs IND 2026

NZ Vs IND 2026

NZ vs IND 2026 : भारतीय संघ ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी20, पाच एकदिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. या दौऱ्यात एकूण 12 सामने होणार असून न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मायदेशातील मालिका दौरा असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

सहा वर्षांनंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर

भारतीय संघ (Team India) कसोटी मालिकेसाठी पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या (New Zealand) भूमीवर पाऊल ठेवणार आहे. यापूर्वी, भारताने 2019/20 हंगामात शेवटचा न्यूझीलंड दौरा केला होता. मात्र, या मधल्या काळात न्यूझीलंड संघाने भारताचे दोन दौरे केले. 2024/25 च्या दौऱ्यात न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा 3-0 ने पराभव केला होता.

तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) एकत्र मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे. विराट आणि रोहितसाठी ही मालिका पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक

टी-20 मालिका

22 ऑक्टोबर – पहिला टी-20, क्राइस्टचर्च
24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, क्राइस्टचर्च
27 ऑक्टोबर – तिसरा टी-20, वेलिंग्टन
30 ऑक्टोबर – चौथा टी-20, ऑकलंड
1 नोव्हेंबर – पाचवा टी-20, हॅमिल्टन

वनडे मालिका

4 नोव्हेंबर – पहिला वनडे, ऑकलंड
7 नोव्हेंबर – दुसरा वनडे, वेलिंग्टन
10 नोव्हेंबर – तिसरा वनडे, हॅमिल्टन
13 नोव्हेंबर – चौथा वनडे, माउंट माऊंगानुई
15 नोव्हेंबर – पाचवा वनडे, माउंट माऊंगानुई

राहुरी व नेवासा तालुक्यात 2 लाख 84 हजार 180 रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त-

कसोटी मालिका

19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन
27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, क्राइस्टचर्च

Exit mobile version