World cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात हैदराबादमध्ये श्रीलंकेने दिलेले 345 धावांचे मोठे लक्ष्य पाकिस्तानने केवळ चार गडी गमावून पूर्ण केले. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे. या विश्वचषकातील पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय आहे.
मोहम्मद रिझवान (नाबाद 134) आणि अब्दुल्ला शफीक (113 धावा) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला. पाकिस्तानी संघ विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध कधीही हरला नाही, हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातही पाकिस्तानने हा विक्रम कायम राखला.
धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान रिझवानने 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 134* (121) तर शफीकने 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 113 (103) धावा केल्या. श्रीलंकेकडून मधुशंकाने 2 बळी घेतले.
वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने उघडले विजयाचे खाते, बांग्लादेशचा 137 धावांनी पराभव
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 344 धावा केल्या. कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने संघाकडून शतके झळकावली. मात्र, त्याचे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ सुरुवातीलाच धक्का बसला. चौथ्या षटकात इमाम उल हक (12) यांच्या रूपाने पहिली विकेट आणि 8व्या षटकात कर्णधार बाबर आझम (10) यांच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचे 2 विकेट लवकर पडल्याने सामन्यावर श्रीलंकेने पकड बनवली होती.
शफीक आणि रिझवान यांनी चमत्कार केला
दोन विकेट लवकर पडल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची धुरा सांभाळली आणि धावसंख्या पुढे नेले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 176 (156) धावांची शानदार भागीदारी केली. 213 धावांच्या स्कोअरवर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने पाकिस्तानने तिसरी विकेट गमावली. मात्र, तोपर्यंत पाकिस्तानचा डाव बऱ्याच अंशी सावरला होता.
तेजस्विनी पंडितच्या ब्लू टिकवरुन रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सौद शकीलने 30 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. 45व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शकील बाद झाला. त्याला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महिष तिक्षानाने बोल्ड केले. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या इफ्तिखार अहमदने 22 धावांचे योगदान दिले. या वेळी मोहम्मद रिझवान दुसऱ्या टोकाला उभा राहिला आणि अखेरीस नाबाद परतला.
श्रीलंकेकडून मधुशंकाने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय महिश तिक्षाना आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. तर इतर एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. मात्र, पथिरानाने सर्वाधिक 9 च्या इकॉनॉमीसह 90 धावा दिल्या.