वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने उघडले विजयाचे खाते, बांग्लादेशचा 137 धावांनी पराभव
World Cup 2023: इंग्लंडने बांग्लादेशचा (ENG vs BAN) 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. बांग्लादेशला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य होते, मात्र शकिब अल हसनचा (Shakib Al Hasan) संघ 48.2 षटकात केवळ 227 धावांच करु शकला. अशाप्रकारे जोस बटलरच्या (Jos Butler) नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये पहिला विजय नोंदवला. याआधी इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
बांग्लादेशकडून सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक धावा केल्या. या यष्टीरक्षक फलंदाजाने 66 चेंडूत 76 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र, त्यानंतर बांग्लादेश फलंदाज सातत्याने बाद होत राहिले. मुश्कीफुकर रहीमने 64 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. तर तौहीद हृदयने 61 चेंडूत 39 धावांची खेळी केली. बांग्लादेशचा कर्णधार शकीब अल हसनसह मेहंदी हसन, नजमुल हुसेन शांटो आणि तनजीद हसन या फलंदाजांनी निराश केले.
अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती
इंग्लंडकडून रीस टॉप्लेयने सर्वाधिक 4 बळी घेतले. रीस टॉप्लेयने 10 षटकांत 43 धावांत 4 बळी घेतले. ख्रिस वोक्सला 2 विकेट घेतल्या. याशिवाय मार्क वुड, आदिल रशीद, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी 1-1 खेळाडू बाद केले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 364 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर डेव्हिड मलानने 107 चेंडूत 140 धावांची खेळी केली. तर जो रूटने 68 चेंडूत 82 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी जॉनी बेअरस्टोने 59 चेंडूत 52 धावा केल्या.
बांग्लादेशकडून मेहंदी हसनने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर शरीफुल इस्लामने 3 खेळाडूंना बाद केले. याशिवाय तस्किन अहमद आणि शाकिब अल हसन यांनी 1-1 विकेट घेतली.