Paris Olympics 2024 India women’s Archery team reaches quarters : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय महिला तिरंदाजी टीमने (women’s Archery team) बाजी मारली आहे. यामध्ये दिपीका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर या तीन खेळाडुंनी मिळून भारताला 1,983 पॉइंट मिळवून दिले. त्यामुळे भारतीय टीम चौथ्या स्थानावर पोहचली आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
दरम्यान टॉप चारमध्ये असणाऱ्या टीम यांना या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीमध्ये एन्ट्री मिळणार होती. त्यामुळे भारत चौथ्या स्थानावर असल्याने थेटउपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताचा सामना हा फ्रान्स आणि नेदरलँड मध्ये झालेल्या सामन्यात जो कोणता देश विजेता होईल त्याच्याशी होणार आहे.
लंके यांची कोंडी : पारनेरमध्ये ठाकरे गटाने टाकला डाव
दरम्यान या स्पर्धेसाठी तब्बल 128 खेळाडूंना स्थान मिळणार आहे त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना प्रथम राऊंड ऑफ 64 आणि नंतर राऊंड ऑफ 32 फायनल आणि सेमी फायनल या फेऱ्यांमधून प्रवास करावा लागणार आहे.