Paris Olympics Day 12 Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 12 व्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून (Mirabai Chanu) भारताला पदकाची आशा असणार आहे. तर ॲथलीट अविनाश साबळे (Avinash Sable) पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. याच बरोबर महिला गोल्फपटू अदिती अशोक आणि दीक्षा डागर याही आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर 12 व्या दिवशी भारतीय महिलांच्या टेबल टेनिसचा उपांत्यपूर्व फेरीत सामना जर्मनीशी होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये शानदार कामगिरी करत मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले होते. या ऑलिम्पिकमध्ये देखील तिच्याकडून पदकाची भारताला आशा आहे.
अविनाशकडून पदकाची आशा
पात्रता फेरीत चांगली कामगिरी करणारा भारतीय खेळाडू अविनाश साबळे याच्याकडूनही भारताला पदकाची आशा आहे. दुसरीकडे मनिका बत्रा, अर्चना कामथ आणि श्रीजा अकुला यांच्या महिला टेबल टेनिस संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या 12 व्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक
ऍथलेटिक्स
मॅरेथॉन वॉक रिले मिश्रित: सूरज पनवार आणि प्रियांका (सकाळी 11 वाजता)
पुरुष : लॉन्ग जम्प पात्रता: सर्वेश कुशारे (दुपारी 1.35 वाजता)
महिला : 100 मीटर अडथळा रेस राऊंड – 1: ज्योती याराजी (1.45 वाजता)
पुरुष : ट्रिपल जम्प : अब्दुल्ला आणि प्रवीण चित्रवाले (रात्री 10.45 वाजता)
पुरुष : 3000 मीटर स्टीपलचेस फायनल : अविनाश साबळे (दुपारी 1.13 वाजता)
गोल्फ
महिला : वैयक्तिक स्ट्रोक प्ले फेरी – 1: आदिती अशोक आणि दीक्षा डागर (दुपारी 12.30 वाजता )
टेबल टेनिस
महिला संघ उपांत्यपूर्व फेरी: भारत विरुद्ध जर्मनी (दुपारी 1.30 वाजता )
कुस्ती
महिला : फ्रीस्टाइल (53 किलो गट) अंतिम पंघाल विरुद्ध तुर्की, (दुपारी 2.30 वाजता)
स्क्रीन रायटर्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये ‘द रेल्वे मॅन’ चा जलवा, जिंकला बेस्ट डायलॉग अवॉर्ड
रेसलिंग
महिला : (49 किलो गट) मीराबाई चानू (रात्री 11 वाजता )