स्क्रीन रायटर्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये ‘द रेल्वे मॅन’ चा जलवा, जिंकला बेस्ट डायलॉग अवॉर्ड

स्क्रीन रायटर्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये ‘द रेल्वे मॅन’ चा जलवा, जिंकला बेस्ट डायलॉग अवॉर्ड

The Railway Man :  YRF एंटरटेनमेंट आणि Netflix ची प्रमुख सिरीज The Railway Man, a thrilling story of heroism, Hope and humanity ला स्क्रीन रायटर्स असोसिएशन पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित बेस्ट डायलॉग अवॉर्ड जिंकला आहे. प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सिरीजच्या उत्कृष्ट लेखनाला हा पुरस्कार दिला जातो.

दिग्दर्शक शिव रवैल आणि लेखक आयुष गुप्ता यांना उत्कृष्ट योगदानासाठी संयुक्तपणे पुरस्कृत करण्यात आले आहे. दिग्दर्शक शिव रवैल आणि लेखक आयुष गुप्ता यांच्या प्रभावी लेखणीने “द रेल्वे मॅन” च्या स्टोरीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. स्क्रीन रायटर्स असोसिएशन पुरस्कार विजय शिव रवैल आणि आयुष गुप्ता यांच्या प्रतिभा आणि समर्पणाला अधोरेखित करतो. ही सिरीज जागतिक प्रेक्षकांमध्येच गाजल्याने विजय शिव रवैल आणि आयुष गुप्ता यांच्या कार्याचा संपूर्ण जगात कौतुक होत आहे.

यशराज फिल्म्स निर्मित आणि आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली, नवोदित दिग्दर्शक शिव रवैल YRF साठी द रेल्वे मॅन ही जागतिक हिट सिरीज घेऊन आले आहे. या सिरीजमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेच्या भयंकर रात्री भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या असामान्य शौर्याची स्टोरी दाखवण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी सर्व संकटांविरुद्ध आणि  हवेत अदृश्य शत्रूशी लढताना आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आपले प्राण कसे पणाला लावले याबाबत या स्टोरीमध्ये दाखवण्यात आले आहे.

18 नोव्हेंबर रोजी प्रीमियर झालेली ही 4 भागांची मिनी-सिरीज, जगभरातील मीडिया आणि प्रेक्षकांकडून सर्वानुमते पॉजिटीव्ह रिव्यू मिळवणारी एक सुपरहिट स्टोरी आहे!

Veda Movie : वेदासाठी बॉक्सिंग शिकली! शर्वरीने स्वीकारला ॲक्शन चित्रपटासाठी ‘बीस्ट मोड’ 

सत्यकथांवरून प्रेरित, या मोहक सिरीजमध्ये आर माधवन, केके मेनन, दिव्येंदू, बाबिल खान, जुही चावला आणि मंदिरा बेदी यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. “द रेल्वे मॅन” ला त्याच्या आकर्षक स्क्रिप्ट राइटिंगसाठी आणि सशक्त व्यक्तिरेखेसाठी प्रशंसा मिळत आहे आणि हा पुरस्कार तिला एक उत्कृष्ट सिरीज म्हणून आणखी मजबूत करतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube